ठळक मुद्देविदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक व कोअर कमिटी सदस्य तेजराव मुंढे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगाव मही: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सोमवारी विदर्भ बंदचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक व कोअर कमिटी सदस्य तेजराव मुंढे यांनी दिली आहे.स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वीज भारनियमन बंद करण्यात यावे, ४ लाख बेरोजगारांना नोकर्या देण्यात याव्यात, कपाशीवरील बोंडअळीमुळे झालेले नुकसानाची भरपाई देण्यात यावी यासह उत्पादन खर्च आणि ५0 टक्के नफा एवढा हमीभाव देण्यात यावा, या मागण्या आहेत.