मोदींच्या गुजरातेतील शाळाबाह्य मुलांना महाराष्ट्रीयन गुरूजींचा लळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 12:30 PM
Education News : मराठमोळ्या गुरूजीने चक्क गुजरातेतील शाळाबाह्य विद्यार्थ्यांना साक्षर करण्याचा विडा उचललाय.
- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ‘प्रत्येक दगडात लपलेलं असते एक सुंदर शिल्प...साकारण्याची गरज असते... दृष्टी कल्पकतेची, कारागिरीची आणि कष्टाची...’ या उक्तीचा परिचय देत मराठमोळ्या गुरूजीने चक्क गुजरातेतीलशाळाबाह्य विद्यार्थ्यांना साक्षर करण्याचा विडा उचललाय. गुरूजींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गुजरातेतीलशाळाबाह्य मुलं आता चक्क मराठीचे धडे गिरवित असून, विद्यार्थ्यांना शिकविता शिकविता गुरूजींची देखील गुजरातीवर पकड निर्माण होत आहे.-गुजरातच्या सुरेंद्र नगर जिल्ह्यातील रणू मीर, गोपाल मीर, हरि मीर, देवा मीर, किसन मीर यांचे कुटुंबीय आपल्या काठेवाडी गाई, म्हशी तसेच इतर जनावरांसह महाराष्ट्रातील खामगाव जि. बुलडाणा येथे दुग्ध व्यवसायासाठी आले. लिबडी तालुक्यातील क्लोळ या खेड्यातील रहिवासी असलेल्या मीर कुटुंबियांनी खामगाव येथील आदर्श नगर परिसरातील मोकळ्या जागेत आणि जनुना रोडवरील एका शेतात तात्पुरते निवारे उभारले आहे. शुध्द दुधासाठी अनेकजण या कुटुुंबियांकडे जातात. त्यापैकी हिवरखेड केंद्र शाळेचे शिक्षक गजानन जाधव एक होत. त्यांनी या शाळा बाह्य विद्यार्थ्यांची जिज्ञासा हेरली. जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने या विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासाठी प्रामाणित प्रयत्न केलेत. कोरोना काळात शाळा बंद असलेल्या वेळेचा त्यांनी अक्षरक्ष: सदुपयोग केला. त्यामुळे गुजरातेतील मीर परिवारातील चिले-पिले आणि महिला व्यवहार ज्ञानापुरते साक्षर होताहेत. हे येथे विशेष! महाराष्ट्रातील शाळेत प्रवेश मिळावा!- मीर कुटुंबियांसोबतच त्यांची मुलंही शाळा सोडून महाराष्ट्राची रहीवासी झालीत. तिकडे साभांळ करताना कुणीच नसल्याचे नियतीने महाराष्ट्राचे रहीवासी झालेले हे विद्यार्थी गुजरातेत शाळाबाह्य ठरले. या विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशाचा तांत्रिक तिढा निर्माण झाल्याने, हिवरखेड केंद्र शाळेचे शिक्षक जी.ए.जाधव यांनी मीर परिवारातील चिल्यापिल्यांना साक्षर करण्याचा वसा जोपासला आहे. या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील शाळेत प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा त्यांच्या पालकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.- जाधव गुरूजी माझ्यासह भावंडांना गत तीन वर्षांपासून सातत्याने शिकवित आहेत. त्यांच्यामुळे बरेच ज्ञान मिळाले. त्यांनी पुस्तकेही मिळवून दिली आहेत. गुरूजींच्या साध्या आणि सोप्या पध्दतीमुळे पाढे शिकणे सुलभ झाले आहे.- दर्शन रणू मीरविद्यार्थी. - जाधव गुरूजींची कोरोना काळात खूप मदत झाली. त्यांच्यामुळेच शिक्षणाची गोडी निर्माण झाली. आम्हाला शिकविण्यापूर्वी गुरूजींनी गुजराती भाषा आत्मसात केली. गुरूजी आता आम्हाला नियमित शाळेत टाकण्यासाठी प्रयत्नरत आहेत.- लाभू मीरविद्यार्थीनी कोरोना काळात शाळा बंद होत्या. या वेळेचा सदुपयोग या विद्यार्थ्यांना सामाजिक अंतर ठेवून शिकविण्यासाठी केला. दुध विकत घेण्यासाठी जात असतानाच विद्यार्थ्यांना नियमित शिकविण्यास सुरूवात केली.-गजानन जाधवशिक्षक, खामगाव.