लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने १७४ गावांमध्ये आर्थिक नुकसानीची पातळी गाठली आहे. कृषि विभाग विविध उपाय योजनांच्या माध्यमातून बोंड अळीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. तरी या उपाय योजनांचा प्रभावी वापर करीत बोंड अळीवर नियंत्रण मिळवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात बोंड अळी नियंत्रणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी जायभाये आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नाईक यांनी सादरीकरण केले. ते म्हणाले, बोंड अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सायंकाळी फवारणी करावी. दिवसा फवाणी ही प्रभावी ठरत नाही. तसेच पेस्टीसाईड हे गॅस श्रेणीतील वापरावे. बोंड अळी नियंत्रणासाठी कामगंध व प्रकाश सापळे लावण्यात यावेत. जिनींग परीसरातही किमान २० ते २५ कामगंध सापळे लावावेत. जेणेकरून नर पतंग सापळ्याकडे आकर्षित होवून मरण पावतील. बोंड अळी नियंत्रण जनजागृती करण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील १७४ गावांमध्ये बाेंडअळीचा प्रकाेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 5:58 PM