बीबी : श्रीनगर (काश्मीर) येथील इनडोअर स्पोर्ट हॉल पोलो ग्राउंड येथे २३ ते ४२ मार्च दरम्यान राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मातृतीर्थाच्या मुलींनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत महाराष्ट्र संघामधील रेग्यु या इव्हेंटमध्ये जूनियर गटातील आरती रमेश खंडागळे, ऋतुजा दत्ता दानवे, मयुरी बद्रीप्रसाद नागरे या रेग्यु संघिनी यांनी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून कांस्य पदक (ब्राँझ मेडल) मिळवून पूर्ण भारतात महाराष्ट्र संघाचे व महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट संघटनेचे नाव उंचावले आहे. याबद्दल जनरल सेक्रेटरी व भारतीय फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले आणि महाराष्ट्र संघटनेचे टेक्निकल डायरेक्टर व बुलडाणा पिंच्याक सिल्याट संघटनेचे अध्यक्ष संकेत धामंदे यांनी खेळाडूंना उत्कृष्ट मार्गदर्शन करून त्यांचे अभिनंदन केले.