जिल्ह्यात दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल महिन्यात ऑक्सिनजची मागणी वाढण्यास प्रारंभ झाला होता. एप्रिलअखेरीस ती महत्त्मपातळीवर पोहोचली होती. त्यातच ऑक्सिनज बेडची उपलब्धताही कमी होती. व्हेंटिलेटर बेड, आयसीयू बेड रुग्ण गंभीर असतानाही मिळत नव्हते. अनेकांना त्यामुळे वेटिंगवर किंवा अन्य रुग्णालयात रिकाम्या होणाऱ्या बेडवर पाठविले जात होते. त्यातूनच कोविड रुग्णांलयातील उपलबध जागांसाठी थेट डॅशबोर्डही जिल्हा प्रशासनाने कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मे महिना संपताना जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण घटण्यास प्रारंभ झाला असून, ऑक्सिजनचीही मागणी घटली आहे. त्याचप्रमाणे गंभीर रुग्णांचेही प्रमाण घटत आहे.
-- ३५ टक्क्यांनी मागणीत घट--
जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यावर १७ मेट्रिक टनांपर्यंत ऑक्सिजनची मागणी पोहोचली होती. ती आता तब्बल ३५ टक्क्यांनी घटली असून, साधारणत: १० ते ११ मेट्रिक टनांच्या आसपास सध्या ही मागणी कमी जास्त होत आहे. खासगी व सरकारी मिळून जिल्ह्यातील ९४ रुग्णालयांमध्ये कोविडवर उपचार सध्या केले जात आहे. या रुग्णालयातील बाधितांचीही संख्या आता काहीशी कमी झाली आहे. प्रारंभी ऑक्सिजनची मागणी १२.७३ मेट्रिक टनांपर्यंत गेली होती. त्यात सातत्याने वाढ होत होती. आता ती कमी झाली आहे. दरम्यान, आणखी सहा प्लांटचे काम हे प्रगतिपथावर आहे.
--पाच प्लांट कार्यान्वित--
जिल्ह्यात शासकीय व खासगी मिळून एकूण ११ ऑक्सिनज प्लांट उभारण्यात येत आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात ५ ऑक्सिजन जनरेटर प्लांट कार्यान्वित झालेले आहे. यासोबतच बुलडाण्यातील डेडिकेटेड हॉस्पिटलमधील २० केएलचा लिक्विड ऑक्सिजन प्लांटही एप्रिल महिन्यातच कार्यान्वित झालेला आहे. खामगाव आणि बुलडाण्यातील तीन खासगी हॉस्पिटलमध्येही ऑक्सिजन जनरेटर प्लांट कार्यान्वित झाले असून, त्यांनी प्रतिप्लांट २०० एलपीएम एवढी क्षमता आहे. त्यातून जवळपास ७.७४ मेट्रिक टन ऑक्सिजन नियमित स्वरुपात उपलब्ध होण्यास मदत मिळत आहे.
कोविड उपचार सुरू असलेले हॉस्पिटल्स-९४
एकूण उपलब्ध असलेले बेड :- ५१३६
सध्या ऑक्सिजनवर असलेले रुग्ण :- ५३८
व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण :- ५८
आयसीयूमध्ये असलेले रुग्ण :- १७७