लोकमत न्यूज नेटवर्क
सोनोशी : किनगाव राजा पाेलिसांचे वाहन उलटल्याने ठाणेदारांसह पाेलीस कर्मचारी जखमी झाले. ही घटना १५ मे राेजी साेनाेशी गावाजवळ घडली.
किनगाव राजा पाेलीस स्थानकाचे ठाणेदार साेमनाथ पवार हे आपल्या सहकाऱ्यांबराेबर (एमएच २८ सी ६४७३) या वाहनातून वर्दडीकडून साेनाेशी गावाकडे येत हाेते. दरम्यान, त्यांच्या वाहनाचा जॉईंट फुटल्यामुळे व ब्रेक लाईनर चिकटल्यामुळे वाहन आठ ते दहा फूट खोल रस्त्याच्या बाजूला उलटले. यामध्ये ठाणेदार सोमनाथ पवार यांच्यासह चालक व तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. बोल जॉईंट तुटल्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून गाडीचा वेग कमी केल्यामुळे माेठे नुकसान टळले.
पाेलिसांची वाहने झाली भंगार
ग्रामीण भागात पाेलिसांना देण्यात आलेली वाहने भंगार झाली आहेत. तीन-तीन लाख किलाेमीटर धावल्यानंतरही या वाहनांची दुरुस्ती करण्यात येत नाही़. ही वाहने धावू शकत नाहीत. त्यामुळे, चाेरटे किंवा गुन्हेगारांचा पाठलाग कसा करावा, असा प्रश्न पाेलिसांना पडताे. पाेलिसांच्या वाहनांची वेळाेवेळी दुरुस्ती करण्याची तसेच ग्रामीण भागात नवी वाहने देण्याची गरज आहे.