लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सैलानी : सर्व धर्मांचे oद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाच्या समाधीचे पोळा अमावास्येला लाखो भाविकांनी दर्शन घेतले.सैलानी बाबा दर्गाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपर्यातून हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात; परंतु o्रावण महिन्यातील पोळय़ाच्या अमावास्येला फार महत्त्व आहे. पावसाचे कितीही संकट आले तरी या संकटाला न जुमानता पोळा अमावास्येला सैलानी बाबाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येऊन सैलानी बाबाच्या समाधीवर नतमस्तक होतात व सैलानी बाबांच्या झिर्याच्या पाण्याने अंघोळ करून सैलानी बाबाच्या समाधीवर गल्फ फूल, चादर चढवतात तसेच घराकडे परतीला जात असताना सैलानी बाबांच्या झिर्यांचे पाणी तीर्थ म्हणून सोबत घेऊन जातात. यावर्षीही पोळा अमावास्येला पावसाचे सैलानी येथे आगमन झाले. या पावसाला न जुमानता ओले होऊन भाविकांनी सैलानी बाबाचे दर्शन घेऊनच भाविक परतले. सैलानी बाबाच्या दर्शनासाठी भारताच्या कानाकोर्यातून भाविक येतात; परंतु जवळपास पन्नास टक्के भाविक हे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून येतात; मात्र मराठवाड्यात गेल्या तीन वर्षांपासून सतत दुष्काळ असल्यामुळे व यावर्षीही पाऊस चांगला नसल्यामुळे सैलानी येथील व्यापार्यांच्या व्यवसायावर या दुष्काळाचे परिणाम मोठय़ा प्रमाणात दिसून आले.
पोलिसांचा चोख बंदोबस्त बुलडाणा पोलीस उपविभागीय अधिकारी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जे.एन. सैयद त्यांचे सहकारी पोलीस यांनी पोळा अमावास्येला चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.