या रूट मार्चमध्ये उपविभागीय अधिकारी गणेश राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, तहसीलदार डॉ.संजय गरकल, पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान, न.प. मुख्य अधिकारी सचिन गाडे आदी अधिकारी सहभागी होते. या सर्वांनी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाटिका, अंजाना चौक, आठवडी बाजार, मस्तान चौक, व्यापारी लाइन, सराफा लाइन, स्व.दिलीपराव रहाटे चौक, खालचे बस स्टँड, मेन रोड, कृषी उत्पन्न बाजार समिती, जुने बस स्टँड, जिजाऊ चौक, जानेफळ फाटा, नागसेन चौक, बस स्टँड आदी सर्व परिसरांत रूट मार्च करत, व्यापारी व जनतेला नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व नागरिकावर कडक कारवाई करण्याचा इशाराही या वेळी दिला. या रूट मार्चमध्ये पोलीस, महसूल, नगरपरिषद शिक्षक व इतर कर्मचारी सहभागी होते.
कोरोनाला न घाबरता प्रत्येकाने स्वतःची व कुटुंबांची काळजी घ्यावी. यासोबतच फक्त प्रशासनालाच जबाबदार न धरता, प्रत्येकाने या संकटाविरुद्ध लढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
सचिन गाडे, मुख्याधिकारी, नगरपालिका, मेहकर