मधुकर खरात यांचे गावापासून एक किलोमीटर अंतरावर रोड लगत शेत आहे .या शेतामध्ये विविध प्रकारचे भाजीपाला फळाचे उत्पादन ते घेत असतात . यावर्षी त्यांनी रसवंती सुद्धा सुरू केले होती .परंतु तळपत्या उन्हात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काहीतरी केले पाहिजे या उदात्त हेतूने ईद व अक्षय तृतीयेच्या दिवशी राम - रहीम - नावाने पाणपोई सुरु केली .या पाणपोईचे उद्घाटन ग्रामविकास अधिकारी अर्जुन गवई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच विनोद खरात, पोलीस पाटील मदन हाडे, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर गावंडे , माजी सरपंच रमेश पागोरे, प्रकाश खोसे मास्तर ,सुरेश खरात, पत्रकार सचिन खंडारे, सैनिक योगेश बंगाळे ,शरद खरात ,गुलाबराव बेलोडे आदी उपस्थित हाेते़
साखरखेर्डा येथे सुरू केली पाणपाेई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:33 AM