प्रवाशांची भागविली तहान
जिल्ह्यात प्रत्येक बसस्थानकामध्ये प्रवाशांसाठी पाणपोई लावण्यात येत आहे. मेहकर
बसस्थानकातील गुणिया पार्सल कार्यालयाचे संतोष अवस्थी यांच्यातर्फे ११ मार्चला महाशिवरात्रीला बसस्थानकात सार्वजनिक पणपोई सुरू करण्यात आली. मेहकर येथील बसस्थानकामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणपोई लावण्यात येते. यंदाही संतोष अवस्थी यांनी पाणपोई लावून सामाजिक दातृत्व जोपासले आहे.
पाण्याचा व्यापार आणि समाजकार्य
उन्हाळा लागताच पूर्वी प्रत्येक रस्त्यावर पाणपोई दिसायच्या. परंतु गेल्या काही वर्षांपासून पाण्याचा व्यापार सुरू झाला आणि पाणपोईचा धर्म 'बाटली बंद' झाल्याचे पाहायला मिळते. यंदा पाण्याच्या या व्यापारातही तहानलेल्यांची तृष्णा भागविण्याचे समाजकार्य सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
प्रमुख मार्गावरील पाणपोईंची संख्या
मेहकर ते मालेगाव १२
बुलडाणा ते मेहकर ९
बुलडाणा ते मलकापूर २५
बुलडाणा ते खामगाव ८
चिखली ते देऊळगाव राजा १०
बुलडाणा ते सिल्लोड २२