लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : मोताळा पंचायत समितीमध्ये कित्येक दिवसांपासून डाटा ऑपरेटर नसल्याने नागरिकांची कामे होत नसल्यावरून संतप्त झालेल्या भाजपच्या पं. स. सदस्याने गटविकास अधिकारी तथा सभापतीच्या कार्यालयातील फर्निचरची तोडफोड करून साहित्य कार्यालयाच्या बाहेर फेकून दिल्याचा प्रकार २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला. गुरूवारी बाजार असल्याने गटविकास अधिकारी संजय पाटील हे शासकीय कामात व्यस्त होते. दरम्यान, भाजपचे पंचायत समिती सदस्य धीरेंद्रसिंह ऊर्फ रावसाहेब देशमुख हे बीडीओच्या कॅबिनमध्ये येऊन संतप्त झालेल्या अवस्थेत त्यांनी टेबलवरच्या काचा फोडल्या व खुच्र्यासह साहित्य बाहेर फेकून दिले. सभापती यांच्या टेबलवरील काचा फोडल्या व त्यानंतर त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. अनेक दिवसांपासून रोजगार हमी योजनेचा डाटा ऑपरेटर नसल्याने तालुक्यातील नागरिकांचे काम होत नाही, असे वक्तव्य करून तेथून ते निघून गेले. यावेळी बीडीओ यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला; मात्र देशमुख यांनी बीडीओ यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारची तक्रार बीडीओ संजय पाटील यांनी पोलिसात दिली. त्यावरून बोराखेडी पोलिसांनी रावसाहेब देशमुख यांच्याविरुद्ध कलम भादंवि ३५३, १८६, ५0४, ५0६, ४२७ महाराष्ट्र मालमत्तेच्या विरोधी अँक्ट प्रतिबंध १९९५ कलमान्वये विविध गुन्ह्याची नोंद केली आहे. वृत्त लिहिस्तोवर आरोपीविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.
पंचायत समिती सदस्याची बीडीओंच्या कक्षात तोडफोड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 12:47 AM
मोताळा : मोताळा पंचायत समितीमध्ये कित्येक दिवसांपासून डाटा ऑपरेटर नसल्याने नागरिकांची कामे होत नसल्यावरून संतप्त झालेल्या भाजपच्या पं. स. सदस्याने गटविकास अधिकारी तथा सभापतीच्या कार्यालयातील फर्निचरची तोडफोड करून साहित्य कार्यालयाच्या बाहेर फेकून दिल्याचा प्रकार २१ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला.
ठळक मुद्देकित्येक दिवसांपासून डाटा ऑपरेटर नसल्याने नागरिकांची कामे खोळंबली संतप्त झालेल्या भाजपच्या सदस्याने साहित्य कार्यालयाच्या बाहेर फेकून दिल्याचा प्रकार