शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
4
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
5
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
8
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
9
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
10
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
11
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
12
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
14
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
15
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
16
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
17
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
18
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
19
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
20
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल

लोणार सरोवरात आढळली पांडवा अरुणी कोळीची प्रजाती!

By admin | Published: May 30, 2017 1:02 AM

जगातील एकमेव दुर्मीळ प्रजाती

किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : लोणार येथे उल्का पडल्यामुळे निर्माण झालेल्या लोणार सरोवराचे नाव जगात पसरलेले आहे; मात्र यामध्ये पुन्हा या सरोवरामध्ये कोळी या प्रजातीचा ‘पांडवा अरूणी’ ही प्रणाली असल्याचे संशोधनामध्ये उघड झाले असून, जगातील ही एकमेव प्रजाती लोणार सरोवरामध्ये आढळली आहे. लोणार सरोवर येथे गेल्या २०१२ पासून दर्यापूर येथील डॉ.अतुल बोडखे हे श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालीत जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालय दर्यापूर येथील कोळी संशोधन प्रयोग शाळेत डी.एस.टी. भारत सरकार अंतर्गत कोळ्याचा अभ्यास सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण कोळ्याच्या ३४ कुळाचा शोध डॉ.अतुल बोडखे व त्यांच्या टिमने केलेला आहे. यापैकी काही कोळ्याची भारतात प्रथमच नोंद झालेली आहे, तर काही जगासाठी नवीन कोळी या सरोवरामध्ये आढळून आलेले आहे. यामध्ये नुकतेच २०१३ मध्ये लोणार सरोवरातील गवताळ भागात एक नवीन कोळी प्रजाती आढळून आली. या कोळ्यावर संशोक्त प्रयोगशाळा जे.डी.पाटील सांगळुदकर महाविद्यालय दर्यापूर येथे डॉ. अतुल बोडखे, डॉ. वीरेंद्र प्रताप, कनियाल, शास्त्रज्ञ, भारतीय वन्य जीव संस्था देहरादून, सुभाष कांबळे, श्रीपात मथेन, डॉ. गजानन सताप व डॉ. महेश चिखले यांनी संशोधन केल्यानंतर सन २०१६ ला या कोळ्यावर संशोधन पत्रिका तयार करून आफ्रिकेतील नामवंत शास्त्रज्ञ जर्नल सर्किट यांच्याकडे पुढील संशोधनासाठी पाठविण्यात आला. संशोधनाचे एक वर्षे पूर्ण झाल्यानंतर हा कोळी जगातील नवीन प्रणाली असल्याचे सिद्ध झाले.जगात नवीन कोळ्याच्या यादीत ‘पांडवा अरूणी’ या कोळ्याचा नुकताच शोध लागलेला आहे. हा कोळी टायटोनीसीडी या कोळ्याच्या कुळातील असून, या कुळाचा शोध १९६७ मध्ये लेटमिन या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. या प्रजातीला श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरूण शेळके यांचे नाव देण्यात आलेले आहे. ही प्रजाती जगभर पांडवा अरूणी या नावाने ओळखल्या जाईल, या कुळातील पांडवा नावाच्या एकूण ५३ प्रजाती जगभर आढळतात. यापैकी एकूण ६ प्रजाती भारतात आढळतात. त्याचप्रमाणे चीन, तंझानिया, केनिया, मडागास्कर, श्रीलंका, व्युगेनिया, जर्मनी, हंगेरी, मॅनमार, थायलंड व पाकिस्तान या देशामध्ये नोंद झालेली आहे; मात्र लोणार सरोवरामध्ये सापडलेल्या या प्रजातीची नोंद नुकतीच झाली आहे. भारतामध्ये सहा जातीचे पांडवा कोळी आढळून येतात. यामध्ये पांडवा शिवा, पांडवा गणेशा, पांडवा कामा, पांडवा गंगा, पांडवा सरस्वती, पांडवा अद्रका इत्यादी प्रजाती भारतात आढळून येतात. लोणार सरोवराने पांडवा अरूणी या कोळ्याच्या नवीन प्रजातीचा शोध लागल्यामुळे लोणारची ख्याती अधिकच वाढली आहे. पांडवा अरूणी कोळ्याची ओळखहा कोळी निशाचर असून, हा प्राणी लहान गवतात आढळतो. रात्रीच्या वेळेला हा प्राणी गवतातील कीटकांना मारून गवताची वाढ होण्यास मदत करतो. तसेच मातीची पोत सुधारण्यासाठीसुद्धा हा कोळी उपयुक्त ठरतो. या कोळ्याची लांबी ५.९ मिमी असून, लाल, पिवळसर रंगाचा हा असतो. पांडवा अरूणी या कोळ्याला आठ डोळे असतात व ते पांढऱ्या रंगाचे असतात. अशा प्रकारचा हा कोळी लोणार सरोवरात आढळून आला असून, तो कोळी जगात इतर कोठेही नसल्याचे आफ्रिकेच्या शास्त्रज्ञांनी जाहीर केले आहे.