या मेळाव्यात समुपदेशन सत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनकाळात उमेदवारांमध्ये रोजगार व स्वयंरोजगार याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन झाले. ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे उद्घाटन २७ एप्रिल रोजी करण्यात आले होते. सहायक आयुक्त सुधाकर झळके यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये ऑनलाइन रोजगार मेळावा व समुपदेशन कार्यशाळेबाबत सविस्तर माहिती दिली. रोजगार मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषद बुलडाण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.ए. चोपडे यांनी केले. या कार्यक्रमात कंपन्यांच्या व्यवस्थापकांनी आपल्या कंपन्यांबद्दलची माहिती उमेदवारांना दिली. प्रा.डॉ. अनंत आवटी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आयक्यूएसी कॉर्डिनेटर प्रा.डॉ. एस.डी. चव्हाण यांनी उमेदवारांना रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोपान चव्हाण यांनी केले. तर, प्रा. डी.एम. शिंबरे यांनी आभार मानले. २८ एप्रिल २०२१ रोजी पुणे येथील प्रा. शरद अशोकराव पाटील यांनी एमपीएससी, यूपीएससी तयारीबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यशाळेकरिता ६६७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. २९ एप्रिल रोजी आयुष्यातील बदल आणि व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर आशुतोष साळी, यंग प्रोफेशनल, मॉडेल करिअर सेंटर, ठाणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डी.व्ही. गोरे होते. ३० एप्रिल रोजी समारोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी एस.आर. काळबांडे, उपायुक्त, कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय, अमरावती व जिल्हा परिषद बुलडाण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी डॉ. सुधीर चव्हाण होते. प्रास्ताविक प्रा.डॉ. अनंत आवटी, परिचय सुधाकर झळके, संचालन प्रा. सोपान चव्हाण यांनी केले. आभार अजय चव्हाण यांनी मानले. व्यंकटेश महाविद्यालयाचे अध्यक्ष राजे विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2021 4:15 AM