किनगावराजा: पांगरी उगले येथील जयपूर तांडा शिवारात गत काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा हैदाेस सुरू आहे. कपाशी, साेयाबीन पिकाची राेही नुकसान करीत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़
पांगरी उगले येथील दीपक मंगलसिंग पवार यांची शेती जयपूर शिवारात ५ एकरात कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड केली आहे. ही जमीन दीपक पवार यांच्या आईच्या नावावर असून त्यामध्ये मिरचीचीदेखील लागवड केली होती. परंतु २० जुलै ते २१ जुलै दरम्यान अंदाजे १०० पेक्षाही जास्त असलेल्या रोहींनी (नीलगाय) शेतीचे माेठ्या प्रमाणात नुकसान केले. या वन्य प्राण्यांचा बंदाेबस्त करण्याची तसेच नुकसानग्रस्तांना मदत देण्याची गरज आहे.