शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

शालेय साहित्यांसाठी पालकांची दमछाक

By admin | Published: July 03, 2017 12:43 AM

खरेदीसाठी बाजारात गर्दी : वाढत्या किमतीमुळे पालकांच्या खिशाला झळ

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर शाळेची पहिली घंटा आता वाजली आहे. शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाल्याने वर्षभरासाठी विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके, वह्या, स्कूल बॅग, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारात विद्यार्थी व पालकवर्गाची गर्दी दिसून येत आहे. या दहा ते पंधरा दिवसात बाजारात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. अनेक पालकांना शक्य नसतानाही आपल्या पाल्याच्या शिक्षणात अडथळा नको म्हणून ते पैशांची तजवीज करताना दिसत आहेत.मार्च, एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर दोन महिन्यांपासून शैक्षणिक संस्थांना सुट्या होत्या. या दरम्यान शाळा, महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला होता. साधारणत: दरवर्षी २६ जूनपासूनच शाळांचे नवीन सत्र सुरू होते. यावर्षी २६ जूनला रमजान ईदची सुटी आल्याने २७ जूनपासून शाळा सुरू झाल्या आहेत. शासनाच्या धोरणानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. तसेच अनुदानित शाळेत सर्वशिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येत आहे. पुस्तके शाळेतूनच मिळत असल्याने बाजारात पुस्तकांशिवाय वह्या, स्कूल बॅग, गणवेश आणि इतर साहित्यासाठी जावेच लागते. त्यामुळे बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत.शाळा उघडण्याच्या आठ दिवसांपूर्वीच शहरातील प्रमुख शैक्षणिक साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांकडून तयारी सुरू करण्यात आली होती. सध्या सकाळपासूनच या दुकानांमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी दिसून येत आहे. सायंकाळपर्यंत सर्वच दुकाने पालकांच्या गर्दीने फुललेली असतात. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके शाळेतूनच उपलब्ध होत आहे; परंतु गणवेश, स्कूल बॅग व इतर सर्व साहित्यांसह आपला बालक शाळेत जावा, अशी सर्व पालकांची अपेक्षा असते. त्यामुळे ते बाजारात गर्दी करतात. यावर्षी विविध कंपन्यांचे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे; परंतु किमती वाढल्याने पालकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी डोनेशन देऊन उरलेला पैसा शालेय साहित्याच्या महागड्या खरेदीवर खर्च होत असल्याने जून महिना पालकांसाठी सर्वाधिक खर्चाचा ठरत आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती याहीपेक्षा बिकट आहे. पेरणीसाठी बियाणे खरेदी करण्याच्या दृष्टीने पैशांची तडजोड करावी की मुलांच्या शिक्षणाची सोय करावी, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी सापडला आहे. यावर्षी जवळपास सर्वच शैक्षणिक वस्तूंच्या किमतीमध्ये दहा ते पंधरा टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यात पालकांची ओढताण होत असली तरी मुलांच्या शिक्षणात कोणत्याही प्रकारची कसर राहू नये, यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहे. ठरावीक ठिकाणी शैक्षणिक साहित्य उपलब्धशहरात मराठीसोबतच आता इंग्रजी माध्यमांच्या शाळाही मोठ्या प्रमाणात आहे. यातच सर्व शाळांचे गणवेश वेगवेगळ्या रंगाचे आहेत. त्यामुळे ठरावीक शाळांचे ठरावीक दुकानांमध्येच गणवेश उपलब्ध आहे. शाळेतर्फेच पालकांना गणवेश कुठे मिळतील, याबाबत सूचना केल्या जातात. त्यामुळे अशा दुकानांमध्ये पालकांची झुंबड उडत आहे.खासगी शाळांचे भरमसाट डोनेशनगेल्या काही वर्षांमध्ये खासगी कॉन्व्हेंटकडे पालकांचा कल वाढला आहे. प्रत्येक जण आपल्या पाल्याला अशा शाळांमध्ये टाकत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात डोनेशन व त्यानंतर महिन्याची फी, संगणक व इतर विविध नावांनी हजारो रुपये पालकांना भरावे लागत आहे. ऐपत नसली तरी शिक्षणाच्या ओढीमुळे पालक पैशांची तरतूद करतात.