संदीप वानखडे
बुलडाणा : गत काही दिवसांपासून बुलडाणा ते खामगाव मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. माेठमाेठे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता आहे. पावसाळ्यात खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात घडत आहेत. अर्धवट असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बुलडाणा ते खामगाव रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले हाेते. घाटातील रस्त्याचे काम करण्यासाठी हा मार्ग एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी बंदही करण्यात आला हाेता. या रस्त्याचे काम कंत्राटदाराने अर्धवट केल्याने, त्याचा मनस्ताप आता वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. घाटातील रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, बुलडाणा भादाेलापासून घाटापर्यंत रस्त्यावर अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडलेले असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. हीच स्थिती घाट संपल्यानंतर पाच ते सहा किमी रस्त्याची आहे. या रस्त्याच्या मधाेमध खड्डे पडल्याने वाहने कशी चालवावी, असा प्रश्न वाहन चालकांना पडत आहे.
रस्ता ठेवला खाेदून
रस्त्याचे काम अर्धवटच करण्यात आले आहे. घाट संपल्यानंतरही काही ठिकाणी अर्धा रस्ता खाेदून ठेवलेला आहे. त्यामध्ये केवळ मातीचा भराव टाकलेला आहे. काही ठिकाणी खाेलगट भाग असल्याने, रात्रीच्या वेळी त्यामध्ये वाहन गेल्यास माेठा अपघात हाेण्याची शक्यता आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
बुलडाणा ते खामगाव दरम्यान अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असून, वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघात हाेत आहेत. रस्त्याच्या मधाेमध माेठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे.
बुलडाणा ते खामगाव रस्त्याचे काही ठिकाणी अर्धवट काम करण्यात आले आहे. नेमके त्याच ठिकाणी रस्त्यावर माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी.
अॅड विरेंद्र झाडाेकार, नागरिक.
घाटातील रस्ता साेडला, तर दाेन्ही बाजूंनी किमान १० किमी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या मधाेमध खड्डे असल्याने वाहने कशी चालवावी, असा प्रश्न वाहन चालकांना पडताे.
राजू अरमाळ, नागरिक.