लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : एकीकडे शासन खड्डे मुक्त रस्त्याची वल्गना करीत असताना मुंबई-नागपूर महामार्गावर डोणगाव येथे राज्य महामार्गावर असणार्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे वाहनधारक त्रस्त असून, या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.डोणगाव हे राज्य महामार्गावरील गाव असून, या गावच्या बसस्थानकाशेजारी असणार्या राज्य महामार्गावर जीवघेणे मोठमोठे खड्डे निर्माण झालेले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने पावसाळ्यात या खड्डय़ांमध्ये पाणी भरल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हे पाहून शेवटी वाहतूक पोलीस किशोर साळवे, शिवसेना शहरप्रमुख प्रकाश मानवतकर, गजानन जाधव, सुरेश फिसके यांनी सदर खड्डय़ांमध्ये टायर लावून वाहनधारकांनी या खड्डय़ांमधून जाऊ नये म्हणून लक्ष केंद्रित केले असले, तरी डोणगाव व परिसरात राज्य महामार्गावर असणारे जीवघेणे खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. या खड्डय़ांबाबत विविध सामाजिक संघटनांनी वेळोवेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महामार्गावरील खड्डय़ांमुळे वाहनधारक त्रस्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:41 PM
डोणगाव : एकीकडे शासन खड्डे मुक्त रस्त्याची वल्गना करीत असताना मुंबई-नागपूर महामार्गावर डोणगाव येथे राज्य महामार्गावर असणार्या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे वाहनधारक त्रस्त असून, या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठळक मुद्देमुंबई-नागपूर महामार्गअपघाताची शक्यता वाढली!