कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते हे होते. कार्यक्रमासाठी रि.पा.इं. अध्यक्ष नरहरी गवई, शाम पठाडे, हैदर सेठ कुरेशी, शाहेद पटेल, ग्रामपंचायत सदस्य हाफिज मिर्चीवाले, संजय गवई, मसूद मेंबर, भाजप शहराध्यक्ष प्रशांत पाखरे, वसंतराव शिरसाठ, प्रताप कौसे, माधव धुंदाळे उपस्थित होते. शांतता समितीच्या सदस्यांसह काही ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नरहरी गवई, शाम पठाडे, हाफिज मिरचीवाले यांनी बकरी ईदनिमित्त मार्गदर्शन करून बकरी ईद शांततेत व साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन केले.
बकरी ईद साधेपणाने साजरी करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद साधेपणाने साजरी करा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण सोनवणे यांनी केले. ठाणेदार नागेश चतरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलीस कर्मचारी सुरेश मांटे, दीपक चव्हाण, गजानन राजपूत यांनी परिश्रम घेतले.