खामगाव : गणेश विसर्जन मिरवणूकीत शांतता पाळून कायद्याचे पुर्ण पालन करावे, व हा उत्सव शांततेत पार पाडावा असे आवाहन सहायक पोलिस अधिक्षक सोळंके यांनी केले. येथील शहर पोलिस स्टेशनमध्ये ६ सप्टेंबर रोजी गणेश मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सोळंके ते बोलत होते. यावेळी विभागीय पोलिस अधिकारी जी. श्रीधर, आमदार भाऊसाहेब फुंडकर, दिलीप सानंदा, नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, उपविभागीय अधिकारी वाघमोडे, नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. ई. नामवाड, तहसीलदार टेंभरे, एमईसीबीचे राठोड, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिली पसिंह पाटील, शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे ठाणेदार ओमप्रकाश अंबाडकर उपस्थित होते. यावेळी आमदार फुंडकर व आमदार सानंदा यांनी गणेश मंडळाच्या कार्यकत्यांना शांततेत व सहकार्याने मिरवणूक काढावी, पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. या बैठकीला ज्ञानदेव मानकर, हाजी बुडनखॉ, गजानन देशमुख, अँड. आकाश फुंडकर, अमोल अंधारे, दर्शनसिंह ठाकूर, कलसिंग गौतम, बाबासाहेब बोबडे रामदास मोहिते, शरद वसतकार, संजय अवताळे, सय्यद गणी, रवी महाले, हुसेन भाई, जाकर भाई, मोहमद नईम, न. जाक हुसेन, गणेश माने, पंजाबराव देशमुख, सुरेश सिंग तोमर, महेंद्र पाठक यांच्यासह गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सौहार्द टिकवण्याचे शांतता कमिटीचे अवाहन
By admin | Published: September 07, 2014 12:10 AM