लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : चेक अनादरीत झाल्याच्या प्रकरणात आरोपीस दहा लाख रुपये दंड तसेच फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून हे दहा लाख रुपये संबंधितास देण्याचा आदेश ९ एप्रिल २0१८ रोजी विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायाधीश वसंत एस. यादव मलकापूर यांनी दिला आहे.यमुना ट्रेडर्स ही एक भागिदारी संस्था असून, सदरचे भागिदारी संस्थेचे भागिदार/पार्टनर १ संजय पंचालाल चांडक पार्टनर २ विकम विजयकुमार चांडक हे दोघे भागिदार आहेत. त्यांनी फिर्यादी बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी र्मया. बुलडाणा (मल्टी स्टेट) शाखा मलकापूर यांच्याकडून कॅश क्रेडीट कर्ज रक्कम ८0 लाख रुपये घेतले होते. त्या कर्जाची थकीत रकमेचा अंशत: भरणा करण्यासाठी यमुना ट्रेडर्सतर्फे भागिदार/पार्टनर नं. १ संजय चंपालाल चांडक पार्टनर २ विकम विजयकुमार चांडक यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर खात्यात दहा लाख रुपयांचा चेक फिर्यादी संस्थेस दिला होता. दिलेला चेक बँकेत वटविण्यास जमा केला असता खात्यामध्ये पुरेशी रक्कम जमा नसल्याने अनादरीत होऊन परत आल्याने बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी र्मया. बुलडाणा (मल्टीस्टेट) शाखा मलकापूर यांनी नोटीस देऊन पंधरा दिवसात चेकची रक्कम देण्याची मागणी करूनदेखील यमुना ट्रेडर्सतर्फे भागिदार/पार्टनर नं. १ संजय चंपालाल चांडक पार्टनर २ विकम विजयकुमार चांडक यांनी दिलेल्या मुदतीत रक्कम भरणा केली नाही म्हणून बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी र्मया. बुलडाणा (मल्टीस्टेट) शाखा मलकापूर यांनी विद्यमान न्यायालयात निगोशिएबल इन्स्टुमेंट अँक्टचे कलम १३८ नुसार फिर्याद फौ.मु.नं. २९२/२0१५ ही दाखल केली होती. अंतिम सुनावणी होऊन फिर्यादीतर्फे विवेक मा. बापट अँडव्होकेट यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीस दहा लाख रुपये दंड तसेच कोर्ट उठेपर्यंत सजा आणि सदरची रक्कम फिर्यादीस नुकसान भरपाई दाखल देण्याचा आदेश दिला.
धनादेश अनादरप्रकरणी एकास दहा लाखाचा दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:05 IST
मलकापूर : चेक अनादरीत झाल्याच्या प्रकरणात आरोपीस दहा लाख रुपये दंड तसेच फिर्यादीस नुकसान भरपाई म्हणून हे दहा लाख रुपये संबंधितास देण्याचा आदेश ९ एप्रिल २0१८ रोजी विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायाधीश वसंत एस. यादव मलकापूर यांनी दिला आहे.
धनादेश अनादरप्रकरणी एकास दहा लाखाचा दंड!
ठळक मुद्देप्रथम श्रेणी न्यायाधीश मलकापूर यांनी दिला आदेश