लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: पेनटाकाळी प्रकल्पाचा कालवा गेल्या वर्षी फुटल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अद्यापही हा प्रश्न प्रशासकीय पातळीवर गांभिर्याने घेतल्या गेलेला नाही. यासोबतच पांढरदेव, घानमोड, मानमोड या गावांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न कायम आहे. प्रकल्पाच्या ४१६ कोटी ५९ लाख रुपयांची सुप्रमा मंजूर झालेली आहे. मात्र अद्यापही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत.गेल्या दोन दिवसापुर्वी खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थिततीत या प्रकल्पाशी संबंधित अडचणी, कालव्याचे प्रश्न, भुसंपादनाचे प्रश्न आणि तीन गावांच्या पुनर्वसनासंदर्भात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यामुळे किमानपक्षी हा विषय प्रशासनाच्या लिस्टवर आलेला आहे.गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पेनटाकळी प्रकल्पातंर्गत दुधा शिवारातील मुख्य कालव्याला भगदाड पडून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून नुकसान झाले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यासोबतच प्रकल्पावरील १४ किमीच्या मुख्य कालव्यातून पाणी झिरपून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दरम्यान फुटलेला हा कालवा दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनाही त्यावेळी शेतकऱ्यांनी अटकाव केला होता.पेनटाकळी प्रकल्पाद्वारे जवळपास १४ हजार २३२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. प्रकल्प पूर्णत्वास केला असला तरी कालव्यांची काही भुसंपादनाची प्रकरणे, तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबीत आहे. या मुद्द्यावर प्रामुख्याने बैठकीत चर्चा करण्यात येऊन या प्रश्नी त्वरेने मार्ग काढण्यासंदर्भात हालचाली करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
बाधितांनाही नुकसान भरपाईची प्रतीक्षागेल्यावर्षी कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यामध्ये पाच शेतकऱ्यांचे नुकसान मोठे होते. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे. दाेन दिवसापुर्वी झालेल्या बैठकीत या विषयावर प्राधान्याने चर्चा करण्यात आली हाेती.कालव्याची दुरुस्ती गरजेचीपेनटाकळी प्रकल्पावरील मुख्य कालव्याची क्षमता ही ८.१८ क्युसेक आहे. पण गेल्या वर्षी २.७ क्युसेक एवढाच पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतरही कालव्याला भगडाद पडले होते. त्यामुळे प्राधान्य क्रमाने हा कालवा दुरुस्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.