- अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून नागरिकांवर प्रशासनाकडून काटेकोर ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे. त्याचवेळी बेफिकीरपणा तसेच नियमांचे पालन करणाऱ्या सामान्यांसह व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्या जाणार असल्याचे संकेत आहेत.खामगाव शहर आणि तालुक्यात प्रशासनाकडून विविध योजना करण्यात येणार आहे. जनता संचारबंदी दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाºयाविरोधात नगर पालिका, महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून संयुक्त कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, शहरातील व्यावसायिक सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सोमवार ते शनिवारपर्यंत दुकाने सुरू ठेवतील. तर रविवार व्यावसायिक कडक बंद पाळतील.
जनता 'कर्फ्यू'दरम्यान बेशिस्त भोवणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 11:56 AM