शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

पाच दिवस सुरू होते नुसते ठो...ठो...ठो...; पोलिस दलाच्या वार्षिक गोळीबार सरावात कर्मचाऱ्यांनी साधला अचूक निशाणा

By भगवान वानखेडे | Published: March 21, 2023 5:50 PM

जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील चांदमारी परिसरातील गोळीबार मैदानावर जिल्हा पोलिस दलाचा गोळीबार सराव १६ ते २१ मार्चदरम्यान सुरू होता.

बुलढाणा : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना शस्त्रांची ओळख व्हावी, यासोबतच शस्त्र चालविण्याचा सराव व्हावा म्हणून वार्षिक गोळीबार सराव १६ ते २१ मार्चदरम्यान राबविण्यात आला. यामध्ये ११२ अधिकाऱ्यांसह १ हजार ८८ कर्मचाऱ्यांनी सराव केला. यामुळे येथील चांदमारी परिसरातील गोळीबार मैदानावर पाच दिवस नुसता ठो...ठो...ठो... असा आवाज घुमत होता. 

जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली येथील चांदमारी परिसरातील गोळीबार मैदानावर जिल्हा पोलिस दलाचा गोळीबार सराव १६ ते २१ मार्चदरम्यान सुरू होता. यामध्ये जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शस्त्र हाताळणी आणि गोळीबाराची उजळणी व्हावी म्हणून वार्षिक गोळीबार सराव राबविण्यात आला. गोळीबार मैदानावर जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सराव करीत असल्याने मैदानावर नुसता फायरिंगचा आवाज घुमत होता. यामध्ये दररोज १५० ते २०० पोलिस कर्मचारी-अधिकारी सहभागी होत होते.

१ हजार ८८ कर्मचारी आणि ११२ अधिकाऱ्यांनी केला सरावया गोळीबाराच्या सरावात पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्या गोळीबाराच्या सरावाची उजळणी करून घेण्यात आली. येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे सामर्थ्य आणि धैर्य या सरावातून येत असल्याने दरवर्षी हा सराव केला जातो. या सरावामध्ये पाच दिवसांत ११२ अधिकारी आणि १ हजार ८८ कर्मचारी सहभागी झाले होते.

या शस्त्राद्वारे केला सरावपोलिसांना पिस्टल, रिव्हाॅल्व्हर, कारबाइन, टेलबोर, एसएलआर, इन्सास आणि एके ४७ या अत्याधुनिक शस्त्राद्वारे गोळीबारचा सराव केला गेला. यातील प्रत्येक शस्त्राच्या प्रत्येकी १० राऊंड देण्यात आल्या होत्या.

लवकरच उजळणी पाठ्यक्रमजिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार सरावानंतर आता पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांंसाठी पोलिस मुख्यालयात उजळणी पाठ्यक्रम सुरू केला जाणार आहे. या उजळणी पाठ्यक्रमांतून पोलिस कर्मचाऱ्यांकडून कायद्याची उजळणी करून घेतली जाणार आहे.

दैनंदिन कामकाजात शस्त्र हाताळणीचा विसर पडू नये म्हणून दरवर्षी गोळीबार सराव केला जातो. यंदाही अधिकारी कर्मचाऱ्यांनी हा सराव केला. यातून परिस्थिती हाताळण्याचे सामर्थ्य येते. कर्मचाऱ्यांसाठी लवकरच उजळणी पाठ्यक्रम राबविला जाणार आहे.-सारंग आवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक, बुलढाणा. 

टॅग्स :Policeपोलिस