शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

सातपुडा पर्वत रांगेतील सालईबनात रंगला मध्य प्रदेशातील आदिवासींचा ‘फगवा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 14:45 IST

खामगाव: आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा फगवा उत्सव रविवारी सालईबनात रंगला.

ठळक मुद्देजळगाव जामोद तालुक्यातील सालईबन येथे रविवारी भव्य फगवा महोत्सव आयोजित करण्यात आला.आदिवासी-वनवासी बांधवांसोबतच मध्यप्रदेशातील विविध आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव आपल्या परिवारासह सहभागी झाले.या महोत्सवात जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी उद्घाटनाच्या सत्रात, तर बुलडाणा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी समारोपीय सत्राला हजेरी लावली.

खामगाव: आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा फगवा उत्सव रविवारी सालईबनात रंगला. यामध्ये महाराष्ट्रासह मध्यप्रदेशातील आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदविला. ढोल, ढोलकी आणि मांडलचा वापर करून १६ आदिवासी- वनवासी चमूंनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

महात्मा गांधी लोकसेवा संघ, सालईबन परिवार आणि तरुणाई फांऊडेशनच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जामोद तालुक्यातील सालईबन येथे रविवारी भव्य फगवा महोत्सव आयोजित करण्यात आला.  या महोत्सवात सातपुड्याच्या पर्वतरांगेतील महाराष्ट्राच्या सीमेवरील आदिवासी-वनवासी बांधवांसोबतच मध्यप्रदेशातील विविध आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधव आपल्या परिवारासह सहभागी झाले.

यात १६ आदिवासी-वनवासी चमूंचा सहभाग होता. महाराष्ट्रातील वडपाणी, बांडापिंपळ, चालठाणा, भिंगारा, गोमाल, चाळीस टापरी, गोरक्षनाथ, उमापूर, इस्लामपूर, चारबन, मेंढाचारी, कुंवरदेव, आमपाणी, सोनबर्डी, वसाडी, हड्यामाल, अंबाबरवा या गावातील आदिवासी चमू सोबतच मध्यप्रदेशातील बादलखोरा, चिल्लारा, आमलापाणी, करोली, जैसोंकी येथील चमू ढोल, ढोलकी आणि ‘माडंल’ घेवून फगवा महोत्सवात सहभागी झाले.  या महोत्सवात जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी उद्घाटनाच्या सत्रात, तर बुलडाणा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी समारोपीय सत्राला हजेरी लावली. सुनगावच्या सरपंच विजयाताई पाटील, ग्रामसेवक टी.जी. चौधरी, उपायुक्त शिवाजी पाचारणे (जीएसटी), अमरावती विद्यापीठाचे अमरावती विभागाचे रासेयोचे समन्वयक प्रा. राजेश मिरगे, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष शिवचरण ठाकूर, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, अजिंक्य फिटनेस सेंटरचे धनंजय भगत, डॉ. सदानंद भुसारी, नाज्यासिंग बोंडळ, तरुणाईचे अध्यक्ष नारायण पिठोरे, मनजीतसिंग सिख यांची यावेळी उपस्थिती होती.

दोन आमदारांचा सहभाग!

आदिवासींच्या फगवा उत्सवात दोन आमदारांनी उपस्थिती दर्शविली. यामध्ये जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार संजय कुटे यांनी फगवा महोत्सवाचे उद्घाटन केले तर, समारोप बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. यावेळी आदिवासी बांधवांनी आमदारद्वयांसोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींचे आपल्या पारंपारिक पध्दतीने स्वागत केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाHoli 2018होळी २०१८Jalgaon Jamodजळगाव जामोद