अनिल गवई/खामगाव: ती मुलं अनाथ नाही, निराधारही नाहीत; पण यातील सर्वच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. यापैकी काहींच्या घरात कौटुंबिक स्वास्थ नाही.. शैक्षणिक सुविधा नाहीत..पण सार्यांकडे शिकण्याची उमेद आणि जिद्द आहे. अशा आदिवासी दुर्गम भागातील चिमुकल्यांसाठी तरुणाई झटत असल्यामुळे सातपुड्यातील ओसाड माळरानावर मोफत शिक्षणाची फुलवारी फुलत आहे. शिक्षण आणि आधुनिक क्रांतीच्या जगापासून कोसो दूर असलेल्या सातपुड्यातील आदिवासींच्या जीवनात शिक्षणाचा गोडवा निर्माण करण्यासाठी तरुणाईने गेल्या सात महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. आदिवासी बालकांना हसत खेळत शिक्षण दिल्या जात असल्यामुळे, जळगाव जामोद तालुक्यात येत असलेल्या वडपाणी, बांडापिंपळ, कुंवरगाव, चालठाणा, चाळीसटापरी, भिंगारा या आदिवासीबहुल वस्तीतील तब्बल ४0-५0 लहान बालकांना आता ह्यफुलवारीह्णचा चांगलाच लळा लागला आहे. शहरी भागातील लहान मुलं किड्स स्कूल, नर्सरीत जातात. हसत- खेळत शिक्षणाचे धडे गिरवतात. त्याच धर्तीवर आदिवासी बालकांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासोबतच राहणीमानाचाही दर्जा सुधारण्यासाठी गेल्या सात महिन्यांपासून ह्यतरुणाईह्णचा मोरक्या घरा-दारावर तुळशीपत्रं ठेवून झटत आहे.
आदिवासींच्या जीवनात रंग भरणारी ‘फुलवारी’
By admin | Published: February 10, 2016 2:07 AM