लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: विद्यार्थी व शाळांमध्ये मूल्यवर्धन कसे रूजले हे दर्शविणारे साडेचार हजार पेक्षा जास्त पोस्टर्स राज्यभरातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी तयार केली आहेत. सध्या राज्यभर मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यात येत असून, मार्चअखेरपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम चालणार आहे. बुलडाण्याच्या मूल्यवर्धन चित्र प्रदर्शनीत १ हजारावर चित्र ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा बोलबाला असल्याचे दिसून आले आहे.राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्यावतीने मूल्यशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तेव्हापासून मागील चार वर्षात राज्य शासनाने हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने वाढवित सर्व शासकीय शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी केली. जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थाचे शिक्षक हे किती कार्यक्षम, क्रियाशील, उत्साही, संवेदनशील व जबाबदार आहेत, यातून स्पष्ट होते आहे. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात मूल्यवर्धन चित्र प्रदर्शनी तीन दिवस घेण्यात येत आहे. २८ फेब्रुवारी रोजी या प्रदर्शनाचा समारोप झाला.
जिल्हानिहाय पोस्टर्सऔरंगाबाद २७, जालना १६, नांदेड १७, हिंगोली १०, बीड १९, लातूर ७, परभणी १९, उस्मानाबाद १८, सातारा १५, सांगली १७, कोल्हापूर ११, सोलापूर ५०, धुळे २४, जळगाव ३७, नंदुरबार २५, ठाणे २७, नाशिक १९, पालघर १०, वाशिम २९, बुलडाणा ३७, अकोला २९, नागपूर ३३, भंडारा २२, गोंदया ४१, गडचिरोली १०, वर्धा १८, चंद्रूपूर १५, यवतमाळ २७, अमरावती २९, सिंधुदुर्ग २३, रत्नागिरी १०, अलिबाग (रायगड) २६, मुंबई १६, अहमदगर १७ व मुंबई २० पोस्टर्सची पेटी राज्यभर फिरविण्यात येत आहे.