लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा : देऊळगावराजा ही बालाजी नगरी म्हणून ओळखल्या जाते. सुमारे चारशे वर्षांंपूर्वीचा इतिहास असणारे श्री बालाजी महाराज यात्रोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या यात्रोत्सवाची सुरुवात आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होत आहे. दिवाळीनंतर या यात्रोत्सवाची सांगता होते. या उत्सवादरम्यान अनेक उत्सव साजरे करण्यात येत आहेत. यातील लाटा मंडपोत्सव २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता सुरुवात करण्यात आला आणि भक्तिभावाने हा लाटा मंडपो त्सव उत्साहाने पार पडला. या यात्रेत महाराष्ट्राच्या कानाको पर्यातून लाखो भक्त श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेण्याकरिता शहरात दाखल होतात. श्री बालाजी महाराज मूर्ती स्थापनेबाबत इतिहासात वेगवेगळी म ते मांडण्यात आली आहेत. २९ सप्टेंबर रोजी श्री बालाजी महाराज यात्रोत्सवाची सुरुवात लाटा मंडोपत्सवापासून सुरू होते. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी सूर्यादोयनी लळित असते. लाटा मंडप दसर्यापूर्वी मंदिरासमोर महाद्वारापासून शिसवीच्या २१ खांब (लाटा) यांच्या साहाय्याने भव्य मंडप उभारून उत्सवाची सुरुवात होते. या लाटा ३0 फूट उंचीच्या व दोन फूट व्यासाच्या असून, दोन्ही बाजूने मिळून ४२ मंडप टाकले जातात. लाटा उभारण्यासाठी श्री बालाजी महाराजांच्या दोर्या बालाजी संस् थानच्या समोरील असलेल्या गरुडाच्या तसेच महाद्वाराजवळील हनुमंताच्या भव्य मूर्तीच्या हातामधील छेदामधून त्यांच्यामागे असलेल्या दगडी खांबाला बांधण्यात येतात. पालखी मिरवणूक दुसर्या दिवशी निघते. श्रवण नक्षत्रावर ‘श्रीं’ची सुमारे एक िक्वंटल वजनाची चांदीची पत्रा लावलेली पालखी आमना नदी काठावर गेल्यानंतर पुरातन काळातील विधीनुसार व प्रथेनुसार आमना नदीतील ओट्यावर ठेवण्यात येते. त्या ठिकाणी श्रींचे भ्राता तिरुपती बालाजी राजे जगदेवराव यांना त्याकाळी दिलेल्या शब्दाप्रमाणे पालखीमध्ये प्रवेश करतात, अशी आख्यायिका आहे. पालखी उत्सव आज रात्री १२ वाजता सुरु होणार आहे. तसेच दि. ८ ऑक्टोबर रोजी लळित उत्सव साजरा होणार आहे. मंडोपोत्सवामध्ये प्रत्येक जाती आणि समाजाला मान देण्यात आलेला आहे. धार्मिक सोहळा लाटा मंडापोत्सवापासून सुरू झालेला आहे. अनेक भाविक भक्त शहरात दाखल झाले आहे त.
लाटा मंडोपत्सवापासून श्री बालाजी महाराजांच्या यात्रेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:19 AM
देऊळगावराजा : देऊळगावराजा ही बालाजी नगरी म्हणून ओळखल्या जाते. सुमारे चारशे वर्षांंपूर्वीचा इतिहास असणारे श्री बालाजी महाराज यात्रोत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या यात्रोत्सवाची सुरुवात आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून होत आहे. दिवाळीनंतर या यात्रोत्सवाची सांगता होते.
ठळक मुद्देबालाजी महाराज पालखी उत्सव ८ ऑक्टोबरला होणार लळितोत्सव