लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा बुद्रूक येथील माय-लेकींच्या तिहेरी हत्याकांड प्रकरणाचा तपास बोराखेडी पोलिसांनी जवळपास पूर्ण केल्या असून येत्या आठवड्यात प्रसंगी मलकापूर न्यायालयात या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले जाण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.पिंपळखुटा येथे १५ ऑक्टोबर रोजी आईसह तिच्या दोन मुलींची निर्घुणपणे हत्या झाल्याचे समोर आले होते. सुमनबाई मालठाणे आणि त्यांच्या दोन मुली राधा मालठाणे व शारदा मालठाणे या तिघांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात गावातीलच आरोपी दादाराव अंबादास म्हैसागर (३८) यास अटक करण्यात आली होती. प्राथमिक तपासात अनैतिक संबंधातून हे तिहेरी हत्याकांड झाल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे राधा मालठाणे आणि शारदा मालठाणे या दोन्ही बहीणी गर्भवती असल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर समोर आले होते. मृत राधाच्या पतीने निधन झाल्यामुळे ती आठ ते दहा वर्षापासून ती माहेरी अर्थात पिंपळखुटा बुद्रूक येथेच राहत होती तर शारदाचाही घटस्फोट झाल्याने ती सुद्धा दीड वर्षापासून आई-वडिलांकडेच राहत होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभिर्य वाढले होते. तर हे मालठाणे कुटुंबिय आरोपी दादाराव म्हैसागर याच्याच शेतात मजुरीने काम करण्यासाठी जात होते. त्यातूनच आरोपी म्हैसागर व मृत राधाचे सुत जुळले होते. त्यातूनच राधाला गर्भधारणा झाली होती. त्यातूनच त्यांच्यात तक्रारी वाढल्या .
डीएनए अहवालाची प्रतीक्षाया प्रकरणाची क्लिष्ठता पाहता वैद्यकीय व तांत्रिक पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीकोणातून पोलिसांनी मृतांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेत अमरावती येथील प्रयोग शाळेत अनुषंगीक नमुने पाठवले होते. अद्याप त्याचा रिपोर्ट प्राप्त झालेला नाही. तोही मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असल्याचे ठाणेदार माधवराव गरुड यांनी सांगितले.