मयुर गोलेच्छा / लोणार तालुक्यातील पिंपळखुटा येथील शेतकर्यांनी ह्यनेट-शेडह्ण चा अवलंब करून बदलत्या पीक पद्धतीचा वापर केला. या प्रकारामुळे हजारो महिलांच्या हाताला काम मिळाले आहे. येथील शेतकर्यांच्या अशा प्रयोगांमुळे तालुक्यातील अनेकांना नियमित रोजगार मिळाला असून, गावच मजुरांचा पोशिंदा ठरले आहे. लोणार तालुक्यातील पिंपळखुटा येथील शेतकरी पूर्वीपासून लोणार शहरात दूध विकून आपली उपजीविका भागवत असत. गावाची लोकसंख्या हजारावर असून, ३१६ शेतकर्यांकडे ८८९ हेक्टर शेतजमीन आहे. येथील शेतकर्यांनी पारंपरिक शेती न करता आपल्या शेतातून नेटमध्ये मिरची, टोमॅटो, टरबूज, मिरचीच्या बियाण्याची निर्मिती केली आहे. कमी क्षेत्रात भरघोस उत्पन्न मिळत असल्याने गावातील बहुतांश शेतकरी बियाणे उत्पादीत करु लागले.; परंतु गावातील शेतकर्यांच्या कुटुंबातून मजूर कमी पडू लागल्याने लोणार येथील महिला मजूर पिंपळखुटा येथील नेटच्या शेतात काम करु लागले. पिंपळखुटा गावातील नेट-शेडमध्ये तयार झालेले मिरची, टोमॅटो, टरबुज, शिमला मिरचीचे बी हे थायलंड, अमेरिका, नेदर लँड, सारख्या देशात जात असल्याने गावाची आर्थिक परिस्थितीच पालटली. गावातील नेटशेडची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.सद्यस्थितीत गावात ३५0 च्यावर नेट-शेड आहेत. लोणार येथून पिंपळखुटा येथील शेतकरी दररोज ७00 महिला मजुरांची ने-आण करुन त्यांच्याकडून नेट-शेड अंतर्गत बियाण्यांची कामे करतात. लहान असलेले पिंपळखुटा हे गाव शेकडो मजुरांचा पोशिंदा ठरत आहे.
पिंपळखुटा गाव बनले मजुरांचा पोशिंदा
By admin | Published: December 25, 2014 1:44 AM