रस्त्यावर पार्किंग
बुलडाणा : बुलडाणा शहरात वाहतुकीचे नियम सर्रास तोडले जात आहेत. यासोबतच शहरातील प्रतिष्ठानासमोर कुठेही पार्किंग झोन उपलब्ध नसून, शहरात रस्त्यावरच पार्किंग केली जात आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तर दुसरीकडे क्षुल्लक कारणावरून वादही उदभविण्याचे प्रसंग शहरात घडले आहेत. तेव्हा संबंधित विभागाने शहरातील पार्किंगच्या व्यवस्थेकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
पाण्याचा अपव्यय
बुलडाणा :बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन जागोजागी फुटली असून, यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे नगरपालिकेने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. असे झाल्यास शहरातील प्रत्येक नळधारकांना पाणी मिळण्यास मदत होणार आहे. तरी येत्या काही दिवसांत पाईप लाईन दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी मागणी होत आहे.