निसर्गाचा वाढता असमतोल , प्राणवायूचे महत्त्व आता प्रत्येक नागरिकाला कळायला लागले . कोरोना काळात ऑक्सिजनसाठी वणवण भटकावे लागत असताना ऑक्सिजन मिळणे कठीण झाले होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत असे सूचक मार्गदर्शन गटशिक्षणाधिकारी तुकाराम आदबने यांनी केले. देऊळगाव राजा येथील गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले , बालाजी अर्बनचे शाखा अधिकारी अतुल शास्त्री , गजानन वायाळ , देवराव जायभाये ,शिवाजीराव उगलमुगले , व्ही. टी. जायभाये , शंकर कायंदे , मदन सानप ,आत्माराम कायंदे ,सुरेश उगलमुगले,भीमराव कायंदे,अशोकराव उगलमुगले ,भानुदास लव्हाळे ,नंदकिशोर शिंगणे , रमेश उगलमुगले ,बद्रीभाऊ जायभाये, गजानन मुंढे, प्रल्हाद जायभाये,कल्याणराव जायभाये,रामेश्वर कायंदे, ज्ञानेश्वर उगलमुगले ,दीपक उगलमुगले उपस्थित होते़
जागदरी येथे वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:42 AM