मागील वर्षी वृक्षारोपण करण्याचे प्रस्तावित होते; परंतु कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव व प्रशासकीय अडचणींमुळे वृक्षारोपणाचा उपक्रम राबविणे शक्य झाले नव्हते. दरम्यान, सध्या पावसाचे वातावरण बघता स्थानिक नागरिकांनी वृक्षारोपण एक सामाजिक उपक्रमाचा कार्यक्रम राबविला. मुख्य रस्त्याचे कडेला तसेच अष्टविनायकनगर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यामध्ये मुख्यत्वे कडुनिंब, पेल्ट्रोफॉर्म, बकुळ, शेवगा व इतर झाडांची निवड करून वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अष्टविनायक विकास मंडळाचे अध्यक्ष गुलाबराव कडाळे, उपाध्यक्ष रमेश डब्बे, सचिव अण्णा पवार, कोषाध्यक्ष संजय देवल व इतर संचालक मंडळी सर्वश्री सुभाषराव ढोले, विजयसिंह रा. राजपूत, सोहम बेलोकर, कीर्तिकुमार दलाल, प्रफुल्ल किनगे, महिला संचालिका वंदना कडाळे, अनुराधा झाल्टे, जयश्री मराठे, संगीता पवार यांनी परिश्रम घेतले. या उपक्रमामध्ये नगरवासी उत्तरेश्वर गलधर, भीमराव रिठे, पुरुषोत्तम झाल्टे, रमेश बदरखे, अरविंद टेकाळे, वासंती टेकाळे यांचा विशेष सहभाग होता.
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे
वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे या संत वचनाप्रमाणे वृक्षांचे महत्त्व आमच्या जीवनात अनन्यसाधारण आहे. निसर्ग आपले आरोग्य जपतो. मग साहजिकच निसर्गाची जपणूक ही आपली जबाबदारी आहे, असा संदेश वृक्षारोपणाच्या या सामाजिक कार्यक्रमातून देण्यात आला. वृक्षारोपण करून मोकळे, झाले नाही तर यावेळी वृक्ष संवर्धनाची जबाबदारी वाटून घेण्यात आली.
युवकांचाही प्रतिसाद
अष्टविनायकनगर मंडळ विविध उपक्रम राबवत आहे. कार्यक्रमात तरुणाई देखील मागे नाही. वृक्षारोपणाच्या या उपक्रमामध्ये युवांचाही प्रतिसाद चांगला दिसून आला. अष्टविनायकनगरातील सोहम झाल्टे, शुभम राजपूत, विनय काळे, ओम औटी यांनीसुद्धा वृक्षारोपणासाठी मदत केली. तसेच वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेतली.