वैज्ञानिक दृष्टिकोनातून वटवृक्षाचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे झाडापासून सोडल्या जाणाऱ्या कार्बन वायूबरोबरच बाष्पाचे प्रमाण अधिक असल्याने तो इतर वृक्षांपेक्षा अधिक शीतलता थंडावा देतो. याशिवाय या झाडाच्या विविध भागांचे अनेक औषधी गुणधर्म माणसासाठी उपयोगी आहेत. वडाच्या चिकाने पायाच्या भेगा भरतात. पारंब्याची टोके मळमळ, उलटीसाठी घासून थेंब देतात. उंदीर तसेच विंचवाच्या दंशावर वडाचा चिक लावावा असेही म्हणतात. वडाची पाने सूज व ठणकेवर गरम करून तेल लावून बांधल्याने आराम पडतो. वृक्षाराेपण ही काळाची गरज असून प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावावा, असे आवाहन यावेळी मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी केले.
शाळेच्यावतीने १ जुलैपर्यंत १०० झाडांचे रोपण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यावेळी अनुप्रीता व्याळेकर, सुनीता हुडेकर, वामिंद्रा गजभिये, अंकिता चहाकर व शीतल तायडे आदी उपस्थित हाेते.