लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खामगाव राजस्व मंडळात ३५ हजारांपेक्षा जास्त ७/१२ उताºयांची संख्या आहे. यापैकी १० हजारांपेक्षा जास्त उतारे खामगाव साज्यात आहेत. खामगाव साज्यातील संगणकीकृत उताºयांची तपासणी चौकशी समिती मार्फत केली जात आहे. या चौकशीत दररोज नवनवीन खुलासे होत असल्याने, ९ सदस्यीय चौकशी समितीचे सदस्यही भांबावून गेलेत. दरम्यान, प्लॉट खरेदी-विक्री घोटाळ्यात फसवणूक झालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.खामगाव भाग-१ चा तलाठी चोपडे याने त्याच्या कार्यकाळात मुळ हस्तलिखीत ७/१२ नुसार तंतोतंत संगणकीकृत ७/१२ तयार करणे व अद्ययावत करणे शासनाने राबविलेल्या आॅनलाईन डाटा करेक्शन युटीलिटी, एडीट आणि रि-एडीट या एनआयसी कार्यक्रमादरम्यान राबविणे गरजेचे होते. मात्र, तलाठी चोपडे याने यातील कच्चे दुवे आणि अधिकाराचा गैरवापर करीत अकृषक भुखंडाच्या (प्लॉट) जाणिवपूर्वक आणि स्वत:च्या लाभासाठी बनावट नोंदी केल्या. महसूल विभागाच्या एका बड्या आणि वरिष्ठ अधिकाºयाच्या पाठबळामुळे चोपडेची चांगलीच चलती होती. त्यामुळे तो आपल्या वरिष्ठांना काही जुमानत नव्हता. चोपडेने केलेल्या फसवणुकीचे एक प्रकरण तहसीलदारांनी निर्दशनास आणून दिल्यानंतर उपविभागीय अधिकाºयांनी चक्क तहसीलदारांचीच कानउघडणी केल्याची चर्चा महसूल विभागाच्या वर्तुळात होत आहे.
गृहनिर्माण सोसायट्यांच्या नोंदीत सर्वाधिक घोळ!तलाठी राजेश चोपडे याने शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांवर लक्ष केंद्रीत करून या सोसायट्यांच्या नोंदीत मोठा घोटाळा केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. गृहनिर्माण सोसायटीतील अलाटमेंट लेटरवर आणि तसेच मुळ नोंदीत खाडाखोड करून तलाठी चोपडे याने आपल्या मर्जीतील दलांलामार्फत अनेकांना कोट्यवधीचा गंडा घातल्याचे स्पष्ट होत आहे.चौकट...खामगाव साज्यातील मालमत्ता धारकांनी काळजी घ्यावी!फसवणुकीचा गुन्हा आणि निलंबित असलेल्या तलाठी राजेश चोपडे याने मोठ्याप्रमाणात प्लॉट खरेदी-विक्रीचा घोळ केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर स्तरावरून नेमलेल्या महसूल विभागाच्या चौकशीत चोपडेचे अनेक कारनामे समोर येत आहेत. त्यामुळे खामगाव साज्यातील मालमत्ता धारकांनी आपल्या मालमत्ता आपल्याच नावे आहे किंवा नाही, याची खात्री करणे गरजेचे झाले आहे. दहा हजार संगणकीकृत नोंदीमध्ये ७२ पेक्षा जास्त जणांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.
चोपडेंकडून आलिशान गाड्याचा वापर!प्लॉट खरेदी-विक्रीच्या घोळा मुख्य सुत्रधार असलेल्या चोपडेकडून नेहमीच आलिशान गाड्यांचा वापर केल्या जात आहे. चोपडेचा खामगावातील एका उच्चभ्रु वस्तीत चोपडेचा आलिशान बंगला आणि पुणे येथे त्याचे कोट्यवधी रूपयांचे फ्लॅट असल्याचा सुत्रांचा दावा आहे. होंडा सिटी, बीएमडब्लू अशा महागड्या गाड्यांमधून त्याचा वावर नेहमीच चर्चेचा विषय राहीला आहे. खामगाव साज्यातील प्लॉट खरेदी-विक्री घोळाची वरिष्ठांच्या आदेशानुसार सविस्तर चौकशी केली जात आहे. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून चौकशी पूर्णत्वास गेल्यानंतर सविस्तर आणि विस्तृत अहवाल सादर करण्यात येईल. खामगाव साज्यातील संशयास्पद नोंदीसोबतच सर्वच नोंदीची तपासणी केली जात आहे. त्यामुळे खºया आणि खोट्या नोंदीचा भंडाफोड होण्यास मदत होईल.- विजयसिंह चव्हाणनायब तहसीलदार तथा विशेष चौकशी समिती पथक प्रमुख, खामगाव.