- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: पोक्रा अर्थात नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेंतर्गत खामगाव उपविभागात शेतकरी, भुमिहीन नागरिंकांनी केलेले अर्ज तब्बल ८ महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे समोर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याच्या शासनाच्या उद्देशाला हरताळ फासल्या जात आहे.दुष्काळग्रस्तांना आधार मिळावा, तसेच पाणी व जमिनीची पोत सुधारण्यासोबतच लहान व मध्यम शेतकऱ्यांचा विकास व्हावा, बदलत्या हवामानानुसार शेतकºयांना शेती करणे सोयीचे व्हावे या उद्देशाने शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कार्यान्वीत केली. ही योजना पुर्णत्वास नेण्यासाठी शासनाने जागतिक बँकेकडून कर्ज देखिल घेतले आहे. एकूण तीन टप्प्यात ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत दुसºया टप्प्यात निवड झालेल्या गावांमधील अनेक नागरिकांनी अर्ज करून ८ महिने झाले तरी अद्याप अनेक अर्ज उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या पुर्व संमतीविना प्रलंबित आहेत.योजनेंतर्गत खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील २७० गावांची निवड करण्यात आली आहे. यात पहिल्या टप्प्यात ८० तर दुसºया टप्प्यात १७० गावांची निवड करण्यात आली. यातील दुसºया टप्प्यातील अनेक अर्जधारक अद्याप लाभाच्या प्रतीक्षेत असून त्यांना योजनेचा कधी लाभ होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.जळगाव, संग्रामपुरातील संख्या मोठी!खामगाव उपविभागातील खामगाव, नांदुरा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील गावांची नानाजी देशमुख कृषी संजिवनी योजनेंतर्गत निवड करण्यात आली आहे. कमी-जास्त प्रमाणात सर्वच तालुक्यातील अर्ज उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या पुर्वसंमतीविना प्रलंबित आहेत. परंतु यात जळगाव जामोद व संग्रामपूर तालुकयातील अर्जांची संख्या मोठी आहे. संपुर्ण उपविभागातून सुमारे ४०० पेक्षा जास्त अर्ज प्रलंबित असल्याची माहिती आहे.
निवडणूक आचारसंहितेमुळे प्रलंबित अर्जांबाबत निर्णय होऊ शकला नाही. येत्या काही दिवसात या प्रक्रीयेला वेग येईल.- नरेंद्र नाईकजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.
गत एप्रिल महिन्यात बंदीस्त शेळीपालनासाठी अर्ज केला आहे. परंतु अद्याप पुर्व संमती मिळाली नाही.- भीमराव तायडे,शेतकरी, खेर्डा.