शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
3
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
4
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
5
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
6
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
7
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
8
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
9
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
10
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
11
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
12
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
13
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
14
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
15
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
16
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
17
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
18
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
19
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
20
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...

उघड्यावर शौचास बसल्यास पोलीस कारवाई!

By admin | Published: March 10, 2016 2:03 AM

संग्रामपूर तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम करमोडा ग्रा.पं.ने घेतला ठराव

संग्रामपूर (बुलडाणा): तालुक्यातील सांसद आदर्श ग्राम करमोडा हे गाव १00 टक्के हगणदरीमुक्त करण्याचा निर्धार येथील महिला सरपंच स्नेहा राजेश वर्गे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील काही प्रतिष्ठितांनी केला आहे. या अंतर्गत गावातील कोणीही उघड्यावर शौचास बसला असल्याचे आढळून आल्यास त्याला १00 रुपये दंड करण्याचा ठराव ग्रामपंचायतच्या सभेत घेतला आहे. सासंद आदर्श गाव करमोडा येथे एकूण ५७४ कुटुंब असून, ५१३ शौचालय बांधकामाचे या गावाकरिता उद्दिष्ट होते. यापैकी ४८0 लाभार्थींनी शौचालय बांधकाम केले असून, उर्वरित ३३ शौचालय बांधकामाचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत ३९५ कुटुंबांनी शौचालयाचे सन २0१५-१६ मध्ये बांधकाम केले आहेत. तर निर्मल भारत योजने अंतर्गत ८६ कुटुंबांनी शौचालयांचे बांधकाम केले आहे. त्यामुळे या गावाची वाटचाल आता १00 टक्के हगणदरीमुक्त गावाकडे होत आहे. येथील महिला सरपंच स्नेहा राजेश वर्गे यांनी पुढाकार घेऊन ग्रा.पं. सदस्या महिलांचा व गावातील काही महिलांना सोबत घेऊन महिलांचा व पुरूषांचा गट तयार करून दररोज पहाटे गावातील घरोघरी जाऊन गाव स्वच्छतेविषयी महत्त्व पटवून देण्यात येत आहे. तसेच उघड्यावर शौचास बसल्यास त्यापासून होणार्‍या रोगराईसंदर्भात महिला व पुरूष गटाकडून जनजागृती करण्यात येत आहे. गत १0 ते १५ दिवसांपासून गाव परिसरात महिला व पुरूषांचे दोन गटांकडून उघड्यावर शौचास जाणार्‍यांना समज देण्यात येत आहे. यामुळे मोहिमेमुळे कोणीही उघड्यावर शौचास जात नसून, यामुळे सांसद आदर्श ग्राम करमोडा हे आता १00 टक्के हगणदरीमुक्त झाले आहे. त्यामुळे गावातील स्वच्छतेत आता भर पडली असून, येथील महिला सरपंचा यांचे गावातील नागरिक कौतुक करीत आहेत.