लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : भयमुक्त खामगाव शहर ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी शहर पोलिसांकडून ‘तक्रार पेटी’चा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमातंर्गत सोमवारी शहरातील विविध भागात तक्रारपेट्या लावण्यात आल्या. शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांच्याहस्ते शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रारपेटी लावण्यात आली.शहरात भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे. लोकाभिमुख पोलिस प्रशासन करण्यासाठी तसेच नागरिकांना तक्रार करताना अडीअडचणी दूर करण्यासाठी तक्रार पेटीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांनी, महिलांनी, मुला-मुलींनी तक्रारी कराव्यात. या पेटीमध्ये टाकण्यात आलेल्या निनावी तक्रारीचेही निरसन करण्यात येणार असल्याचे शहर पोलिस प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.
याठिकाणी लावल्या जातील तक्रारपेटी!खामगाव शहरातील सिध्दीविनायक कॉलेज शेगाव रोड, शिंगणे महाविद्यालय चांदमारी, बस स्थानक खामगाव, जे.व्ही.मेहता हायस्कूल खामगाव, मुन्सीपल हायस्कूल रेल्वेगेट जवळ खामगाव, कॉलेज आॅफ मॅनेजमेंट, केला हिंदी हायस्कूल खामगाव, कन्या हायस्कूल नांदुरा रोड खामगाव, अंजुमन हायस्कूल खामगाव, आयटीआय कॉलेज जलंबरोड खामगाव, जी.एस. कॉलेज खामगाव, बीएचएमएस कॉलेज खामगाव, नॅशनल हायस्कूल खामगाव, महिला महाविद्यालय खामगाव, शहर पोलिस स्टेशनचे मुख्य गेट खामगाव, स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान खामगाव, नाना-नानी पार्क जलंब रोड खामगाव आदी ठिकाणी तक्रारपेट्या लावण्यात येणार आहेत.
शहरातील नागरिकांना तक्रारी आणि गाºहाणी मांडण्यासाठी तक्रारपेटीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील १७ ठिकाणी तक्रार पेटी लावण्यात येत आहेत. या तक्रारपेट्या दर शनिवारी उघडण्यात येतील.- सुनिल अंबुलकरनिरिक्षक, शहर पोलिस स्टेशन, खामगाव.