बुलडाणा : रस्त्यावर वाहने अडवून लूटमार करणाऱ्या आंतरजिल्हा स्तरावरील टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सात आॅगस्ट रोजी अटक केली. आरोपींकडुन आणखी इतर गुन्ह्यातील माहिती समोर येण्याची शक्यता आहे. डोणगाव पोलिस स्टेशन हद्दीत एप्रिल व जुलै महिन्यात रस्त्यावर वाहने अडवून लुटमार करणाºया टोळीने धुमाकूळ घातला होता. यामध्ये दोन घटनेत २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. तपास एलसीबीकडे आल्यानंतर तपासाची चक्रे फिरविण्यात आली. मिळालेल्या गुप्त माहितीवरुन गोपाल पायघन (वय २५ रा. अंजनखेडा जि. वाशिम), सुनील कंकाळ (वय २४ रा. सावरगाव बरडे जि. वाशिम), महादेव कठाळे (वय २४ रा. ब्राम्हणवाडा जि. वाशिम ) या तीनही आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ, सहायक पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर, पोलिस उपनिरीक्षक मिलींदकूमार दवणे, सुधाकर काळे, संजय नागवे, दीपक पवार, अमोल तरमळे, युवराज शिंदे, योगेश सरोदे, कैलास ठोंबरे, गजानन जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला. आरोपींना डोणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांसमोर होते आव्हान
रस्त्यावर वाहने अडवून लुटमार करणाºया टोळीतील आरोपींचा पोलिसांना कोणताच सुगावा नव्हता. त्यामुळे शोध घेवून त्यांना जेरबंद करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हे अवघड काम पूर्ण केले. आरोपींबाबत एलसीबीला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून आरोपींना अटक केली. कॅप्शन : अटक केलेल्या आरोपीसह एलसीबी पथक़