दरम्यान, जिल्हा नियोजन समितीअंतर्गत एक कोटी २५ लाख २५ हजार रुपयांचा निधी पोलीस दलास उपलब्ध करून देण्यात आला आहे. अन्न व अैाषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण १३ एप्रिल रोजी करण्यात येऊन ही वाहने पोलीस दलाच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. आता जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया पोलीस ठाण्यांच्या गरजेनुरूप या वाहनांचे वाटप करणार आहेत.
--व्हीआयपी स्कॉडसाठी हवीत वाहने--
पोलीस दलाने व्हीआयपी स्कॉड आणि मोठ्या नेत्यांच्या दौऱ्यादरम्यान बंदोबस्तासाठीही वाहनांची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यानुषंगाने शासनस्तरावर यासाठी नवीन वाहने उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असून, त्यातही लवकरच यश येईल, असे सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
--पोलिसांची गस्त होणार वेगवान--
पोलीस दलात १६ चारचाकी व १९ दुचाकी वाहने उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे दुचाकीवर गस्त घालणाऱ्या पोलिसांनाही याचा लाभ होणार असून, अगदी गल्लीबोळातही पोलिसांना गस्त घालणे सुलभ होणार आहे.