या अंमलबजावणीच्या आदेशानुसार, देऊळगाव राजापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भिवगावनजीक जालना जिल्हा सरहद्द पूर्वीसुद्धा जिल्हा सीमेवरून वाहन तपासणी करूनच जिल्ह्यात प्रवेश दिला जात होता; परंतु त्यामध्ये वाहन तपासणी करताना अत्यावश्यक सेवेतील वाहनांना तसेच इतर वाहनांची ई-पास सुविधा तपासण्यात येऊन इतर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार असल्याचे उपस्थित पोलीस पथकातील डी. बी. चमकुरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी सांगितले. यावेळी पोलीस पथकातील संतोष कासवे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शासकीय आदेशानुसार जिल्हा सीमेवर चेक पोस्ट येथे जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी आणि जिल्हा परिषद शिक्षक असे हे संयुक्त पथक आहे; परंतु जिल्हा परिषद शिक्षक फक्त रजिस्टरवर नाव नोंदवून देण्यासाठी येत असल्याचे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात देऊळगाव राजा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
जिल्हा सीमेवर पोलीस बंदोबस्त तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:36 AM