अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील एका विद्यालयात विद्यार्थीनीला ‘व्हॅलेंटाईन’ डेच्या दिवशी ‘प्रपोज’करणे एका युवकाच्या चांगलेच अंगलट आले. शाळेच्या आवारात जाऊन विद्यार्थीनीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या विरोधात विनयभंगासोबतच अॅट्रासिटी कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका नामांकित शाळेत विद्यार्थीनीसाठी समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्वच विद्यार्थीनी जमल्या होत्या. या कार्यक्रमा दरम्यान एक युवक आपल्या मित्रांसोबत शाळेच्या आवारात शिरला. कार्यक्रम सुरू असतानाच त्याने एका विद्यार्थीनीला इशारा केला. विद्यालयातील एकांताचा सहारा घेत, आपल्या हातातील गुलाब पुष्प त्या मुलीला देण्याचा प्रयत्न केला. तितक्यात विद्यालयाच्या आवारातील विद्यार्थीनीच्या निदर्शनास ही बाब पडताच, त्यांनी आरडाओरड केल्याने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. घडलेल्या घटनेची माहिती मुलीच्या कुटुंबियांना माहिती पडली. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता तेही शाळेत दाखल झाले. प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत पोहोचले. अखेरीस मुलीच्या तक्रारीवरून शहर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी मुलांविरोधात भादंवि कलम ३५४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
युवकाची दादागिरी!मुलींच्या विद्यालयात मुलांना जाण्यास बंदी असताना अतिशय सिनेस्टाईल पध्दतीने आपल्या मित्रांना सोबत घेत, शाळेत प्रवेश मिळविला. तेथे विद्यार्थीनीला गुलाबपुष्प देत तिचा विनयभंग केला. ऐन व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हा प्रकार घडल्याने पोलिसांनी त्याच्यातील ‘रावणा’चे गर्वहरण केले.
युवका विरोधात अॅट्रासिटीतंर्गतही गुन्हा!शाळेच्या आवारात घुसून एका विनयभंग करणाºया युवका विरोधात शुक्रवारी उशीरा रात्री पोलिसांनी अॅट्रासिटीतंर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील करीत आहेत.
‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी एका विद्यालयातील विद्यार्थीनीचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एका युवका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात अॅट्रासिटी कायद्यातंर्गतही गुन्ह्याची नोंद केली आहे. मुलीच्या विद्यालयात विना परवानगी घुसून त्याने आपल्यातील मग्रुरीचे दर्शन घडविले. पोलिस त्याच्या विरोधात योग्य ती कारवाई करतील.- प्रदीप पाटीलउपविभागीय पोलिस अधिकारी खामगाव.