लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लाच प्रकरणात न्यायालीयन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या बुलडाणा शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी शिवाजी मोरे यास जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ३ जुलै रोजी निलंबित केले आहे.बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी मोरे याने आरोपीला सहकार्य करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी आरोपीचे इंदिरानगरमधील मामा यांनी अमरावती एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुषंगाने पडताळणी करून २ जुलै रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवाजी मोरे यास वाशिम एसीबीच्या पथकाने रंगेहात तीन हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून शनिवारी त्यास बुलडाणा न्यायालयासमोर हजर केले असता २० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यात काही अडचणी आल्यामुळे त्यास न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले हाेते.
लाच प्रकरणातील पोलीस कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 11:39 IST