लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि खामगाव येथील एसडीपीओ गुन्हे शाखेने जनुना आणि नवाफैल एसडीपीओ येथे सुरू असलेल्या जुगारांच्या अड्ड्यावर छापे मारून १६ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुरूवारी रात्री उशिरा करण्यात आली. यावेळी तब्बल साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.खामगाव शहराजवळील जनुना तलाव परिसरात जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून गुरूवारी दुपारी सापळा रचून जनुना शिवारातील जुगार अड्ड्यावर छापा मारण्यात आला. यावेळी संतोष गोडाने, रामदास टाकसाळकर, लक्ष्मीनारायण डाकवाल, फिरोज मो. गौरव चौधे (रा. अकोला), सुरेश शेलकर (रा. गोपाळनगर), शे. शहजाद शे. सलीम (रा. ईदगाह प्लॉट) व अजय खत्री (रा. दाळफैल) यांना एक्का बादशहा नावाचा जुगार खेळतांना रंगेहाथ पकडून त्यांचे जवळून नगदी ३० हजार ४०० रुपये तसेच सहा मोबाईल, , दुचाक्या, एक कार असा पाच लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमला जप्त करण्यात आला. तसेच येथील एसडिपीओ पथकाला नवाफैल भागात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. यावरून त्यांनी गुरूवारी नवाफैलात छापा मारून श्रीकृष्ण प्रभाकर थोरात, प्रकाश श्रीराम जवंजाळ, ज्ञानेश्वर प्रकाश खानझोडे, हरीश प्रकाश खानझोडे, भिमराव अमृता सोळंके (सर्व रा.नवाफैल), मदन मुरलीधर झुनझुनवालासह काहींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १ लाख ७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जुगारावर पोलिसांचा छापा; १६ जुगारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:19 PM