बुलडाणा: स्थानिक गुन्हे शाखेने लोणार येथील एका घरात छापा मारून जुगार खेळणाऱ्या ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल करून मोबाईल, दुचाकी, चारचाकी वाहनांसह रोख रक्कम असा एकूण २८ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमध्ये जिल्ह्यातील काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असल्याची माहिती आहे. या कारवाईत पोलिसांनी संतोष लध्दड (रा. हिवरा आश्रम), अनिल इंगळे (मेहकर), सुधीर गवई (चिखली), एकनाथ गायकवाड (ब्राम्हण चिकना), सुनील सुर्जन (मेहकर), शेख शेखावत (लोणार), शेठ मिस्कीन (लोणार), फारूख खा (खामगाव), जितेंद्र राऊत (चिखली), दत्तात्रय मोगल (सेलू, जि. जालना), अब्दुल अनिस (मेहकर), शरद भानापुरे (सुलतानपूर), शेख राजू (खामगाव), शांताराम जाधव (भीवगाव), इम्रान खान (लोणार), विलास म्हस्के (सोनोशी), अलियारखान (लोणार), राजेंद्र जैन (चिखली), भगवान आघाव (सोनोशी), सागर अंभोरे (नांदुरा) संतोष डोईफोडे (सि. जहाँगीर), विश्वनाथ कुंटला (अहमदनगर), अस्लमखान (लोणार), रामेश्वर मालवणकर (लोणार), शेख तौफिक (लोणार) विठ्ठल आकात (सेलू, जि. जालना), इम्रानखान (लोणार) अब्दूल रफीक (चिखली), गजानन वर्षे (ब्रम्हपुरी), ज्ञानेश्वर खानझोडे (खामगाव), रविराज चव्हाण (लोणार), सुनील साळवे (चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणातील एक आरोपी राजू मापारी (रा. लोणार) हा फरार झाला आहे. त्याच्या राहत्या घरात हा जुगार सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे या ठिकाणी २४ मे रोजी रात्री छापा टाकण्यात आला हाेता. या कारवाईत नगदी दोन लाख ४५ हजार रुपये, २ लाख ६९ हजार रुपये किंमतीचे २५ मोबाईल, तीन लाख ७० हजार रुपयांच्या सात दुचाकी, २० लाख रुपयांची चारचाकी वाहने असा एकूण २८ लाख ८४ हजार ५७९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रकरणी लोणार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिनाभरापासून सुरू होता जुगारराजू मापारी याच्या निवासस्थानी महिनाभरापासून हा जुगार सुरू असल्याची लोणारमध्ये चर्चा आहे. कारवाईदरम्यान तो फरार झाला असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. तोही राजकीय क्षेत्राशी संबंधित असल्याची माहिती आहे. या व्यतिरिक्त जालना, अहमदनगरसह, खामगाव, चिखली, लोणारसह अन्य शहरातील व्यक्ती या ठिकाणी जुगार खेळण्यास येत होते.