या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला़ याप्रसंगी तहसीलदार सुनील सावंत यांना निवेदन देण्यात आले. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. या आरोपींना कठोर शिक्षा न झाल्यास संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनामध्ये देण्यात आला आहे. या धरणे आंदोलनात शिवाजी राजे जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र आढाव, अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन झोरे, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शेख यासीन, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष नितीन चौधरी, कैलास मांटे, राहुल झोटे, सामाजिक कार्यकर्ते बुद्ध चौधरी, रवी ढवळे, सुनील मांटे आदींची यावेळी उपस्थिती होती.
पोलीस हक्क संरक्षण समितीचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:40 AM