स्थानिक पोलीस स्टेशनमधून निघालेला रूट मार्च साबून पुरा, धार चौक, प्रताप चौक, डोंगर चौक, जैन मंदिर, मापारी गल्ली, विनायक चौकमध्ये प्रात्यक्षिक करून धार चौक मार्गे पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये विसर्जन करण्यात आले. हा रूट मार्च जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, यांच्या आदेशाप्रमाणे लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात रूट मार्च काढण्यात आला. तसेच लोणार स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद अहिर, पोलीस सूरज काळे, पोलीस उपनिरीक्षक भारत बरडे, तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी चंद्रशेखर मुरुडकर, गोपनीय विभागाचे संतोष चव्हाण, विठ्ठल चव्हाण व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
लोणार शहरातून पोलिसांचा रूट मार्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 4:41 AM