बुलढाणा : साेनाळा पाेलिस स्टेशनच्या हद्दीतील टुनकी येथे देशी पिस्तूलची विक्री करण्यासाठी आलेल्या हरयाणातील एकास पाेलिसांनी २३ फेब्रुवारी राेजी रात्री अटक केली़ वसीम खान ईलीयास खान रा़ सिंगर पुन्हाना जिल्हा नूहू राज्य हरयाणा असे आराेपीचे नाव आहे़. या आराेपीकडून सहा देशी पिस्तुलासह १ लाख ८४ हजार ३२० रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती जिल्हा पाेलिस अधीक्षक सुनील कडासणे यांनी पत्रकार परिषदेत दिली़.
साेनाळा हद्दीतील टुनकी बु ते लाडणापूर रस्त्यावरील केदार नदीच्या पुलाजवळ एक जण देशी पिस्तूल खरेदी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली़ या माहितीच्या आधारे पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले़ त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून देशी बनावटीचे सहा पिस्तूल किंमत प्रत्येकी ३० हजार असे १ लाख ८० हजार रुपये, ७ नग पिस्टल मॅगझीन किंमत दाेन हजार रुपये, एक जिवंत काडतूस किंमत ५००, राेख १ हजार १२० व इतर असा १ लाख ८४ हजार ३२० रुपयांचा ऐवज जप्त केला़ ही कारवाई पाेलिस अधीक्षक सुनील कडासणे, अपर पाेलिस अधीक्षक बी़ बी़ महामुनी, एसडीपीओ डी. एस. गवळी यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलिस निरीक्षक चंद्रकांत पाटील, हेकाॅ विनाेद शिंबरे, पाेकाॅ राहुल राहुल पवार, चापाेकाॅ शेख इम्रान शेख रहेमान यांच्या पथकाने केली़.
आराेपींच्या शाेधासाठी पथके रवाना
या प्रकरणात आणखी आराेपींचा सहभाग असण्याची शक्यता आहे़ त्यामुळे, या आराेपींच्या शाेधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पाेलिस निरीक्षक अशाेक लांडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले आहे़ आराेपींच्या शाेधासाठी पथक रवाना करण्यात आले आहे़ या प्रकरणाचा पुढील तपास साेनाळा पाेलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चंद्रकांत पाटील करीत आहेत़.