शेगाव : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या कडक अंमलबजावणीसाठी राज्यातील विविध नगर पालिकांकडून कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. तथापि, मंगळवारी सकाळी उघड्यावर शौच करणाऱ्या २८ जणांवर पोलिस कारवाई करण्यात आली. उघड्यावरील हगणदरी रोखण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाय योजना केल्या जातात. शौचालय नसलेल्या नागरिकांकना शासकीय अनुदानातून शौचालय निर्मितीसाठी अर्थसहाय्य देखील करण्यात आले. मात्र, तरी देखील उघड्यावरील हगणदरी थांबविण्यास नागरिकांकडून सहकार्य मिळत नाही. या पार्श्वभूमीवर आता पालिका प्रशासनाकडून कठोर उपाययोजना करण्यात येत असून, मंगळवारी २८ जणांविरोधात पोलिस कारवाई करण्यात आली आहे.
उघड्यावर शौच करणाºया २८ जणांची पोलिस स्टेशन वारी!
By admin | Published: June 20, 2017 1:13 PM