शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

‘शुभ मंगल सावधान’...ऐवजी पळा...पळा पोलीस आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 11:46 AM

Violation of Rule : सभारंभातील व्यक्तीसंख्या मर्यादेपेक्षा अधिक झाल्याने वधू पित्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देवऱ्हाड्यावर विवाह सोहळा सोडून धूम ठोकण्याचा बाका प्रसंग आला. पोलिसांनी संबंधितांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : व्यक्ती संख्या आणि वेळेच्या मर्यादेचे उल्लघंन करणाऱ्या २०० पेक्षा अधिक वऱ्हाड्यावर विवाह सोहळा सोडून धूम ठोकण्याचा बाका प्रसंग आला. ‘शुभ मंगल सावधान’...ऐवजी पळा...पळा पोलीस आले...म्हणत लग्नसमारंभातील आबालवृध्दांनी  मिळेल त्या दिशेने एकच धूम ठोकली. तर  जनुना येथील एका सोहळ्यात पथकाच्या समोरच वऱ्हाड्यांचा ॲाटो आला. सभारंभातील व्यक्तीसंख्या मर्यादेपेक्षा अधिक झाल्याने वधू पित्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत २५ व्यक्तींपर्यतच्या मर्यादेत दोन तासाच्या आत विवाह सोहळा आटोपण्यास शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, ग्रामीण भागात नियम डावलून विवाह सोहळे पार पडत आहेत. त्यामुळे अशा विवाह सोहळ्यांवर पोलिसांचा वॉच असून, रविवारी खामगाव- शेगाव रोडवरील एका खेड्यातील लग्न समारंभात सहभागी झालेल्या २०० पेक्षा जास्त वऱ्हाड्यांना विवाह अर्ध्यावर सोडून वाट मिळेल त्या दिशेने पळ काढावा लागला वऱ्हाड्यांनी ऐनवेळी धूम ठोकल्याने, पोलिस  आणि पथकाची कारवाई टळली असली तरी, वऱ्हाड्यांना लग्न सोडून धूम ठोकण्याची नामुष्की पत्करावी लागली. हा प्रकार आता ग्रामीण भागात चांगलाच चर्चिल्या जात आहे. काही वऱ्हाड्यांनी गावातील आणि ओळखीच्या घरात आसरा घेतला होता. बराच वेळ पोलीस लग्नस्थळी हजर होते. त्यामुळे अनेकजण लग्नस्थळी न जाता परत आपापल्या गावी परतल्याची जोरदार चर्चा गावात होत आहे. 

वऱ्हाडी म्हणून आलेल्या पोलिसांनाही ओळखले! n शेगाव तालुक्यातील चिखली खुर्द येथील एका लग्न समारंभात गत आठवड्यात पोलीस वऱ्हाडी म्हणून सहभागी झाले. त्यानंतर वधू आणि वरपित्यावर कारवाई करण्यात आली. तशीच शक्कल शेगाव पोलीसांनी या विवाह सोहळ्यातही लढविली. मात्र, ग्रामस्थांच्या सतर्कतेने पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले. पोलिसांची कारवाईची व्यूहरचना गावकऱ्यांनी उलथुन लावली.

निरोप्यांनी हाणून पाडला पोलिसांचा बेत ! शेगाव पोलिसांनी गाडी मुख्य रस्त्यावर ठेवली. सिव्हील ड्रेसमध्ये गाव गाठले. मात्र, गाडी उभी केल्यानंतर गावात पायी जात असलेले पोलीस गावातील नागरिकांच्या चाणाक्ष नजरतेून सुटू शकले नाहीत. फाट्यावर तैनात असलेल्या निरोप्यांनी  पोलीस गावात पोहोचण्यापूर्वीच ‘निरोपा’ची मोहीम फत्ते केली. त्यामुळे वऱ्हाडी म्हणून गावाच्या वेशीवर गेलेल्या पोलिसांना कारवाई विनाच पोहचावे लागले. 

वेळेवरील ‘योगायोग’ पडला महागात!

सोमवारी खामगाव येथील एक विवाह सोहळा जनुना देवीवर पार पडला. विवाह सोहळा सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलीसांना मिळताच, पोलिसांचे एक पथक लग्नस्थळी पोहोचले. पथक पोहोचता क्षणी विवाह मंडपात मर्यादित संख्येत वऱ्हाडी होते. त्यामुळे पथक परतण्याच्या मार्गावर होते. मात्र, त्याचवेळी एका ऑटोतून मुलीकडील सात महिला वऱ्हाडी लग्नस्थळी अचानक पोहोचल्या. या सात महिलांमुळे लग्न समारंभातील वऱ्हाडी संख्या ३२ वर पोहोचली. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी संबंधितांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला.

कारवाईसाठी आलेल्या पोलिसांचे आदरातिथ्य!

सिव्हील ड्रेसवर कारवाईसाठी लग्नस्थळी पोहोचलेल्या आणि निरोप्यांनी ओळखलेल्या दोन पोलिसांचे वऱ्हाडी नियोजित स्थळावरून गायब झाल्यानंतर आदरातिथ्य करण्यात आले. पाहुणे म्हणून दोन पोलिसांना लग्नस्थळी जेवण आणि रोडवर उभ्या गाडीत असलेल्या पथकासाठी ‘शिदोरी’ देत वधू पित्याने आपले ‘कर्तव्य’ निभविले.

टॅग्स :khamgaonखामगावmarriageलग्न