असा असणार पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाभर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामध्ये एक जिल्हा पोलीस अधीक्षक, दोन अपर पोलीस अधीक्षक, ७ उपविभागीय पोलीस अधिकारी, ३० पोलीस निरीक्षक, ५६ सहाय्यक पोलीस निरीक्षक, १२० पोलीस उपनिरीक्षक, १ एसआरपी कंपनी, ९०० होमगार्ड पुरुष आणि १०० महिला होमगार्ड, ३ आरसीपी प्लाटून, ७५ बाहेरील रेल्वेचे कर्मचारी असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सूर्योदय ते सूर्यास्त असा आहे मुहूर्त
गणरायांची स्थापना करण्यासाठी दिवसभरात असा कोणताही ठराविक मुहूर्त नाही. सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत तुम्ही कधीही गणेशमूर्तीची स्थापना करू शकता. मात्र, माध्यान्हाआधीही स्थापना केलेली शुभ मानली जाते. अशी माहिती येथील वेदशास्त्रसंपन्न संजय पाठक गुरुजी यांनी दिली.
सार्वजनिक मूर्ती चार फुटांची
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही मूर्तींच्या उंचीवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी बसविण्यात येणारी मूर्तीची उंची ही ४ फूट ठरविण्यात आली आहे. तर घरातील मूर्तीची उंची ही २ फूट असणार या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.